| |

कंटाळवाणा भिंगाचा चष्मा झाला नकोसा? मग करा हे उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणत्याही डिजिटल स्क्रीनचा अति वापर जसे कि, मोबाईल, टीव्ही, संगणक यांमुळे चष्मा लागण्याची समस्या उदभवते. याशिवाय झोप पूर्ण न होणे, अति जागरण अशा कारणांमूळेदेखील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही चष्मा लागू शकतो. हल्ली चष्म्याच्या कटकटीपासून सुटका मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. पण हे तंत्रज्ञान प्रत्येकाच्या खिशाला परवडण्याजोगे नाही. यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी आहे काही घरगुती सोप्पे उपाय घेऊन आलो आहोत ज्यांच्या सहाय्याने तुम्ही अगदी भिंगाच्या चष्म्याचा नंबर कमी करू शकता. तसेच हे उपाय सांगितल्याप्रमाणे विशेष कालावधीत केल्यास चष्मा निघूनही जाईल. हे उपाय इतके चमत्कारिक आणि गुणकारी उपाय आहेत. कोणते आहेत हे उपाय ?…चला तर मग जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

० उपाय १ – १ चमचा बडीशेप, २ बदाम आणि १/२ चमचा खडी साखर
वरील साहित्याची एकत्र पूड करून हे मिश्रण १ ग्लास दुधात घोळून प्या.

० उपाय २ – ग्रीन टी प्या.
ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. यामुळे दररोज ग्रीन टी प्या.

० उपाय ३ – हिरव्या भाज्या खा.
दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश कराच. कारण यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.

० उपाय ४ – ६ ते ७ बदाम
दररोज रात्री वाटीभर पाण्यात बदाम भिजत ठेवा आणि सकाळी सालीसकट खा.

० उपाय ५ – त्रिफळा
दररोज रात्री त्रिफळा भिजवून ठेवा आणि त्याच्या पाण्याने सकाळी डोळे धुवा.

० उपाय ६ – अक्रोडचे तेल
अक्रोडाच्या तेलाने दररोज रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या चारही बाजूंना मसाज करा. असे केल्याने डोळ्याच्या नसा मोकळ्या आणि शांत होतील.

० उपाय ७ – १ चमचा जिरे, १ चमचा खडीसाखर, १ चमचा तूप
जिरे आणि खडीसाखरेचा एकत्रित केलेली पावडर दररोज एक चमचा तुपासोबत खा.

० उपाय ८ – ३ ते ४ हिरव्या वेलची, १ चमचा बडीशोप, १ ग्लास दूध
वेलची आणि बडीशेप एकत्र वाटून हे मिश्रण दररोज रात्री १ ग्लास दुधासोबत प्या.

० उपाय ९ – तिळाचे तेल
तिळाच्या तेलाने पायाच्या तळव्यांना मसाज करा.

० उपाय १० – गाजरचा ज्यूस
गाजर हे डोळ्यांसाठी गुणकारी असल्याने रोज १ ग्लास गाजराचा ज्यूस प्या.