Monday, June 5, 2023

टक्कल पडणे नको गं बाई; जाणून घ्या रामबाण उपाय

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केस गळती हि समस्या इतकी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे कि, प्रत्येक व्यक्ती यामुळे ट्रस्ट आहे. खरतर केस गळतीची समस्या एक अशी समस्या आहे जी वेळेत सुटली नाही तर टक्कल पडू शकते आणि यामुळे सौंदर्याला गालबोट लागण्याची शक्यता अधिक असते. मुख्य म्हणजे हि समस्या होण्यासाठी कोणतेही वय कारणीभूत नाही. तर वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली या समस्येचे मूळ कारण आहे. याशिवाय पुरुष सो किंवा स्त्रिया दोघांमध्येही या समस्येचे प्रमाण अधिक आहे. परंतु ही समस्या स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे. केस गळणे सामान्य असले तरी केस जास्त गळल्याने टक्कल पडण्याचे लक्षण दिसते. हे टक्कल लपवण्यासाठी मग नाही नाही ते उद्योग करावे लागतात. पण टक्कल लपवायचे कशाला? यापेक्षा टक्कल होणार नाही याची काळजी घेऊया ना. यासाठी आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे टक्कल पडण्यावर रामबाण मानले जातात. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) नारळ आणि ऑलिव्ह ऑईल – या उपायासाठी नारळाच्या तेलात थोडे ऑलिव्ह ऑईल घालून हलके गरम करून घ्या. यानंतर त्यात ४ ग्रॅम कापूर घाला. एकदा का कापूर विरघळला, हे तेल कोमट करून हळूहळू केसांच्या मुळांवर लावा. हे सतत डोक्यावर लावल्याने नवीन केस वाढू लागतात, यामुळे केस गळणे थांबते आणि केस मजबूत बनतात.

२) मेथीचे दाणे – केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी मेथी प्रभावी आहे. टक्कल निघून जाण्यासाठी रात्री थोडी मेथी पाण्यात भिजवावी. नंतर सकाळी याची बारीक पेस्ट करून घ्या आणि आंघोळ करण्यापूर्वी हि पेस्ट डोक्यावर लावा. पुढे अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. पुढे आठवड्यातून किमान २ वेळा हि कृती करा. यामुळे केसगळती थांबते, केस दाट होतात आणि टक्कल पडण्यापासून मुक्त होते.

३) लिंबू – टक्कल पडलेल्या डोक्यावर केस आणायचे असतील तर लिंबू सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी थोडेसे पाणी घ्या आणि त्यात लिंबूच्या बिया बारीक करा. मग ते आपल्या डोक्याच्या टाळूवर लावा. हा उपाय नियमित केल्याने टक्कल पडलेल्या भागावर केस येतात आणि डोक्यावर केस पुन्हा वाढतात.

४) कलौजी बिया – टक्कल पडलेल्या भागावर केस येण्यासाठी कलौजीला बारीक करून पाण्यात मिसळा. याच पाण्याने आपले डोके धुवा आणि काही दिवस असे दररोज करा. यामुळे केसगळती थांबेल आणि डोक्यावर पुन्हा नवीन केस वाढू लागतील.

५) कोरफड – नारळाच्या तेलात कोरफडीचा ताजा गर सुरीच्या सहाय्याने काढून मिसळा. यानंतर हे मिश्रण डोक्याच्या टाळूपासून केसांना लावा. यामुळे केसगळती थांबेल आणि केसांची मूळे मजबूत होतील. शिवाय केस मऊ आणि लांबसडक देखील होतील.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...