| |

‘हे’ पेय दररोज प्याल तर वाढते वजन सहज नियंत्रित कराल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलती जीवनशैली, धावपळीचे दिनक्रम आणि बिघडलेले खानपान नियोजन यामुळे वाढत्या वजनाची समस्या दिवसागणिक वाढू लागली आहे. मग अनेक लोक हे वाढणारे वजन कमी करण्यासाठी अनेको प्रयत्न करताना दिसतात. मात्र, हे वजन काही केल्या कमी होत नाही. यामुळे लोक चिंता व्यक्त करू लागतात. पण यासाठी चिंता करण्याची नव्हे तर योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करण्याची गरज आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे वजन नियंत्रित करण्यासाठी आपण काय खातो, किती खातो आणि कधी खातो हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी एका खास पेयाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्याचे सेवन करून तुम्ही आपले वाढलेले वजन कमी आणि वाढणारे वजन नियंत्रित करू शकाल.

१) साहित्य
लसूण – ६ ते ७ पाकळ्या
मध – १ चमचा
लिंबाचा रस – १ चमचा

० कृती – यासाठी १ ग्लास पाण्यात ठेचलेला लसूण आणि मध एकत्र करून गॅसवर मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवावे. यानंतर साधारण २० मिनिटे हे पाणी गॅसवर असेच मंद गतीने उकळू द्यावे. या पाण्याला उकळी आल्यानंतर शेवटी त्यात लिंबू मिसळावे.

० सेवन – हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. यामुळे वाढणारे किंवा वाढलेले वजन कमी आणि नियंत्रित राहील.

२)साहित्य
बडीशेप – ३ चमचे
जिरे – २ चमचे
गुळाची पावडर – ४ चमचे
ग्रीन टी – ३ चमचे
मध – १ चमचा
सुंठ पावडर – २ चमचे
दालचिनी पावडर – ३ चमचे
लिंबाचा रस – १ चमचा

० कृती – वरील सर्व साहित्यांपैकी फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व जिन्नस एकमेकांत व्यवस्थित मिसळून घ्या. त्यानंतर हे साहित्य ३ ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळून मिश्रित करा. त्यानंतर हे मिश्रण साधारण ३० मिनिटे अर्थात अर्धा तास मंद आचेवर गॅसवर ठेवा. पुढे थंड करून प्या.

० सेवन – हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. आपल्या शरीरावरील अनावश्यक चरबी आणि शरीरातील मेद कमी होण्यास हे पेय फायदेशीर आहे.

३) साहित्य
काळी मिरी ७ ते ८
पाणी १ ग्लास

० कृती – काळीमिळी पाण्यात घालून हे पाणी गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवा. साधारण २० ते ३० मिनिटे हे पाणी चांगले उकळू द्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या.

० सेवन – हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. हे पेय दररोज प्यायल्याने वजन कमी होतेच. शिवाय रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. इतकेच नव्हे, तर चयापचय वाढविण्यास तसेच अनावश्यक चरबी घटविण्यास देखील मदत करते.