| | | |

हळदीचं दूध प्याल तर एकदम स्ट्रॉंग व्हाल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हळद ही अँटिसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मासाठी ओळखली जाते. तर दूध हे कॅल्शियमचा प्रमुख स्त्रोत असल्याने शरीर आणि मेंदू यांसाठी हळदीचे दूध अगदी अमृतसमान आहे. कारण दोघांचेही गुणधर्म आपल्या शरीरासाठी पोषक म्हणून कार्यरत असतात. सर्वसाधारणपणे हळदीचे दूध सर्दी झाल्यावर किंवा शारीरिक वेदना जाणवलयास सोप्पा घरगुती उपाय म्हणून वापरला जातो. याशिवायदेखील हळदीच्या दुधाचे बरेच फायदे आहेत? तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) सर्दी – सर्दी झाली किंवा कफचा त्रास झाल्यास हळदीच्या दुधाचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे सर्दीतून लवकर आराम मिळतो. गरम दुधाचे सेवन केल्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ विरघळतो आणि लवकर दूर होतो. शिवाय हिवाळ्याच्या काळात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने संसर्गजन्य रोगांचे संक्रमण होत नाही.

२) शारीरिक वेदना – जर आपल्याला हात, पाय किंवा शरीराच्या अन्य भागांमध्ये वेदना होत असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे. त्यामुळॆ शरीराच्या वेदनेत आराम मिळतो.

३) सांधेदुखीपासून आराम – हळदीच्या दुधाचे दररोज सेवन केल्याने सांध्यात निर्माण झालेला ताठरपणा दूर होतो. शिवाय सांध्यांचे स्नायू लवचिक होतात आणि वेदनांपासून आराम मिळतो.

४) मजबूत हाडे – दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात. तर हळदीमध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारे गुणधर्म असतात. यामुळे हाडांशी संबंधित समस्यांपासून मुक्तता होते आणि ऑस्टिओपोरोसिस कमी होतो.

५) रक्तातील साखरेत घट – रक्तातील साखरेची पातळी प्रमाणापेक्षा जास्त असल्यास हळदयुक्त दुधाचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केले असता रक्तातील साखर जास्त प्रमाणात कमी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या.

६) श्वसनात त्रास – हळदीच्या दुधामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे दमा, ब्राँकायटिस, सायनस, फुफ्फुसातील दाटपणा आणि कफापासून मुक्तता देतात. शिवाय गरम दुधाचे सेवन केल्याने शरीरात उष्णतेचा संचार होऊन श्वसनासंबंधित त्रास कमी होण्यात मदत मिळते.

७) पाचक प्रणालीत गडबड – हळदीच्या दुधाचे सेवन आपल्या आतड्यांचे रोगांपासून रक्षण करते. पोटाचा अल्सर, अतिसार, अपचन, कोलायटिस आणि मूळव्याधासारख्या समस्यांमध्ये हळदीचे दूध गुणकारी असते.

८) जखम झाल्यास – जर कधी आपल्या शरीराच्या बाहेरील किंवा आतील भागास दुखापत झालीच तर, हळदीचे दूध शक्य तितक्या लवकर दुखापत बरे करण्यात फायदेशीर आहे, हे विसरू नका. कारण हे अँटी बॅक्टेरिया आणि एंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे जखमेवाटे शरीरात पसरू पाहणारा बॅक्टेरिया वाढू देत नाही.

९) विषाणूजन्य संक्रमण – व्हायरल इन्फेक्शनमध्ये हळदीचे दूध हा अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी उपाय आहे. हळदीचे दूध आपल्याला संसर्गापासून वाचविण्यास सक्षम असते.

१०) त्वचेच्या समस्या – दुधासह हळदीचे सेवन अँटिसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मयुक्त असल्याने हळूहळू त्वचेच्या संसर्ग, खाज सुटणे, मुरुम इत्यादी समस्यांचा नायनाट होतो. यामुळे आपली त्वचा स्वच्छ ,निरोगी आणि चमकदार होते.