| | |

दुधात खजूर भिजवून खाल तर सर्दी, खोकला होईल छूमंतर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खजूर अथवा खारीक हा पदार्थ ड्रायफ्रूट प्रकारात मोडतो. तसेच हा पदार्थ उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. मुख्य म्हणजे खजूर साखरेला पर्याय असल्यामुळे अगदी मधुमेही देखील चवीने खातात. एवढंच नाही तर खजूर नियमित खाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणूनच मित्रांनो दैनंदिन जीवनात नियमित खजूर अथवा खारीक खा. पण नुसता खजूर खाण्यापेक्षा दुधात भिजवून खा. यामुळे खजूर जास्त चविष्ट लागतोच शिवाय आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरतो. तुम्हाला माहित आहे का? दुधासोबत खजूर खाण्यामुळे सर्दी, खोकला, अशक्तपणा, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी हळू हळू कमी होते आणि कालांतराने नष्ट होते. चला तर जाणून घेऊयात दूध-खजूर खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

० दुधात भिजवलेले खजूर – खारीक का खायचे?
– दुधात खजूर किंवा खारीक भिजवून खाण्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या कमी होतात. यासाठी सकाळी कोमट दुधात एक ते दोन खजूर अथवा खारीक आतील बी काढून भिजवा आणि मग हे दुध प्या. यामुळे होणारे फायदे जाणून घ्या.

१) सर्दी आणि खोकला होईल गायब – सर्दीवर आपण कितीतरी उपाय करतो. जसे कि, अनेक प्रकारची औषधं, काढे, वाफ घेणे इ. मुळात वातावरणातील बदल, अॅलर्जी, इनफेक्शन, गारवा अशा कारणांमुळे सर्दी, खोकला होतो. तर सर्दी, खोकला होऊ नये किंवा यापासून सुटका व्हावी यासाठी नियमित २ खजूर दुधात भिजवून खा. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि सर्दी, खोकल्यापासून त्वरित सुटका मिळेल.

२) अशक्तपणावर मात – खजूरामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे शरीरातील रक्तात वाढ होते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यासाठी आणि अशक्तपणा कमी होण्यासाठी खजूर अथवा खारीक खाणे फायद्याचे असते. यासाठी दुधात १-२ खजूर/खारीक, केसर आणि आलं टाकून ते उकळावे आणि हे दूध नियमित प्यावे. यामुळे शारीरिक अशक्तपणा नक्कीच दूर होईल.

३) बद्धकोष्ठतेपासून आराम – अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार आणि जेवणाची, झोपण्याची चुकीची वेळ त्यामुळॆ बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. शिवाय बद्धकोष्ठता झाल्यास दिवसभर शरीर जड वाटतं आणि पोटात दुखणे, पोट स्वच्छ न होणे, छातीत जळजळ असेही त्रास जाणवतात. परंतु जर तुम्ही सकाळी उठल्यावर दररोज दुधात भिजवलेले खजूर खाल्ले तर तुमचं पोट स्वच्छ होईल आणि बद्धकोष्ठत्यापासून आराम मिळेल.

४) ह्रदयाची काळजी – आहाराबाबत असलेल्या चुकीच्या सवयी हृदयाचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. सतत जंकफूड, तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याचा परिणाम थाट आरोग्यावर होतो. यासाठी नियमित दुधात भिजवलेले खजूर खा. यामुळे हृदयाचे आरोग्य नक्कीच सुधारेल.

५) अनिद्रेचा नाश – झोप पूर्ण न झाल्यास अनेक त्रास जाणवतात. त्यामुळे अनिद्रेवर वेळीच उपाय करायला हवा. कारण निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला किमान ७-८ तास शांत झोप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला जर अनिद्रेचा त्रास असेल तर दररोज दुधात भिजवलेले खजूर खा. ज्यामुळे तुमच्या झोपेची समस्या कमी होईल आणि शांत झोप लागेल. यामुळे आरोग्यात सुधार होईल.