| | |

‘हे’ पदार्थ खा आणि उष्णतेवर मात करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे हवेतील तापमान अतिशय उष्ण आहे. अशा वातावरणात जीव अगदी नकोनकोसा होतो. त्यात जर घरातून बाहेर पडायचे असेल तर अगदीच कंटाळा येतो. त्यात रखरखते उन्ह त्वचेचे आणि शरीराचे असे हाल करते कि सांगताही येत नाही. अशा वेळी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. तसेच शरीरातून अधिकाधिक घामातून पाणी उत्सर्जित होऊन जाते. यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. ज्यामुळे आरोग्यविषयक तक्रारी आणखीच वाढतात.

त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनमुळे शरीरात पाण्याची कमतरता तर होतेच पण पीएच पातळीही कमी होते. पीएच पातळी राखण्यासाठी आपल्याला पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, क्लोराईड आणि फॉस्फरस या पोषक तत्वांची आवश्यकता असते. यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. यांचे संतुलन चांगले असल्यास शरीराचे आरोग्य सुव्यस्थित राहते. म्हणूनच आज आपण उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी असे कोणते पदार्थ खाल्ल्याने फायदा होईल हे जाणून घेऊ. ज्यामुळे तुम्ही यंदाचा उन्हाळा सुखकर करू शकाल.

वरील पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. शिवाय इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राहते आणि शरीराला याचा फायदा होतो. त्यामुळे या चालू उन्हाळ्यात आपल्या आहारात वरील पदार्थ असतील याची काळजी घ्यायला विसरू नका.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *