| |

दुधासोबत हे पदार्थ खाल तर नंतर होईल पश्चाताप; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दुधाचे सेवन हे निश्चितच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण दुध म्हणजे पूर्ण आहार. दुधामध्ये अनेको पोषक तत्त्व समाविष्ट असतात. यात कॅल्शियम आणि प्रोटीनचे अधिक प्रमाण असते. हे घटक आपल्या शारीरिक विकासाची गरज आहेत. मात्र दुधाचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. काही असे पदार्थ आहेत ज्यांचे दुधासोबत सेवन करणे शरीरासाठी घातक असते. मात्र अनेकांना या पदार्थांची माहिती नसल्यामूळे त्यांचे सेवन केले जाते आणि मग विविध समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचे दुधासोबत सेवन करू नये.

१) कच्चा कांदा – दूध पितेवेळी किंवा आधी वा नंतर कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचा रोग होतात. यामुळे स्किन इन्फेक्शन, खाज आणि अन्य त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

२) उडीद डाळ – अनेक लोकांच्या आहारात उडिदाच्या डाळीचा अधिक समावेश असतो. या लोकांनी रात्रीच्यावेळी उडीद डाळीचे सेवन केल्यावर दूध पिणे प्रामुख्याने टाळावे. कारण, उडदावर दूध प्यायल्याने अन्न पचायला त्रास होतो. यामुळे पोटाशी निगडित समस्यांना सामोरे जावे लागते.

३) दही – दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. शिवाय आतडे दुखी आणि हगवण अश्या समस्यांना उभारी येते.

४) नमकीन – मीठ आणि दूध यांचे एकत्र सेवन करणे हे इतर कोणत्याही कॉम्बिनेशन पेक्षा अधिक हानिकारक आहे. कारण अशा प्रकारचे सेवन लिव्हर संबंधीत त्रास निर्माण करतात. दुधात प्रोटीन आणि मिठात आयोडीनचे प्रमाण अधिक असल्याने याचा विपरित प्रभाव लिव्हरवर पडतो.

५) मसालेदार पदार्थ – मसालेदार पदार्थांचे सेवन केले असता त्यावर दूध पिण्याने पचन तंत्रावर विपरित परिणाम होतो. यामुळे जेवण पचण्यास त्रास होतो आणि पोटदुखी, जळजळ, गॅस यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

६) मासे – मासे खाताना त्यासोबत दूध किंवा दुधाने तयार केलेला कोणताही पदार्थ खाणे टाळावे. अन्यथा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे स्किन ऍलर्जी होऊ शकते आणि त्वचेवर पांढरे डाग पडतात. शिवाय याचा थेट पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.

७) आंबट पदार्थ – दुधासोबत दही, लिंबू किंवा इतर आंबट फळं खाल्ल्याने अपचन होते. पोटात दूध फाटल्यामुळे अॅसिडिटी, उलटी किंवा मळमळणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.

८) चेरी – दुधामध्ये चेरी टाकून खाणे चविष्ट लागते म्हणून अधिक लोक चेरी मिल्कशेक बनवून पितात. मात्र हे द्रव्य शरीराचे नुकसान करणारे ठरू शकते. आयुर्वेदानेही हे मान्य केले आहे.