‘हे’ पदार्थ खालं तर प्रोटिनसाठी केवळ मांसाहार करणे सोडून द्याल; जाणून घ्या

0
108
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला जर सुदृढ आणि निरोगी असे शरीर हवे असेल तर त्यासाठी दररोज व्यायाम आणि शरीरातील प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वे यांचे योग्य प्रमाणात संतुलन असणे आवश्यक आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, सर्वसामान्य व्यक्तीने दररोज आपल्या वजनच्या तुलनेत प्रति किलोग्राम ०.८-१ ग्रॅम प्रथिने खावीत. पण शाकाहारी लोक असा विचार करतात की प्रथिने फक्त अंडी, मांस किंवा मग मासे यांतून मिळते. पण मुळात या गोष्टीत तथ्य नाही. कारण मांसाहाराइतके शाकाहारातसुद्धा असे पदार्थ आहेत जे प्रोटीन देण्यास परिपूर्ण असतात. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही मांसाहार केल्याशिवाय सहज प्रोटीन मिळवू शकाल.

१) डाळी – घराघरात उपलब्ध असणारी डाळ प्रोटीनच्या बाबतीत इतर पदार्थांपेक्षा कमी नाही. कारण डाळीचे सेवन करून आपल्याला दररोज आवश्यक असणारी प्रथिने अगदीच सहज मिळू शकतात. FDA नुसार, १०० ग्रॅम शिजवलेल्या डाळीत ९.०२ ग्रॅम प्रथिने असतात. मात्र, प्रथिनांचे प्रमाण डाळींच्या विविध प्रकारानुसार किंचित बदलू शकते.

२) काबुली चणा – अनेक लोकांना छोले राईस किंवा छोले भटुरे प्रचंड आवडतात. ह्या छोलेचा अर्थात काबुली चण्याचा वापर आपण प्रथिने मिळविण्यासाठी करू शकतो. प्रथिनेच काय तर कॉम्प्लेक्स कार्ब, फायबर, लोह, फोलेट, पोटॅशियम इत्यादी पोषक द्रव्यांसह देखील हा चणा समृद्ध आहे. FDAनुसार १०० ग्रॅम काबुली चण्यांमध्ये अंदाजे ८.८६ ग्रॅम प्रथिने असतात.

३) हिरवा वाटाणा/ मटार – हिरव्या वाटाण्याच्या लहान लहान कणात प्रथिने समाविष्ट असतात. हिरव्या वाटाण्यांचे सेवन केल्याने प्रथिनेच नव्हे तर जीवनसत्व ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, थायमिन, फोलेट इत्यादी देखील मिळतात. FDAच्या मते, १०० ग्रॅम मटारमध्ये ४.७१ ग्रॅम प्रथिने असतात.

४) टोफू – टोफू हे प्रथिने मिळविण्यासाठी उत्कृष्ट पदार्थ आहे. मुळात टोफू पनीर सारखे दिसते. त्यात त्याला स्वतःची चव नसते. परंतु ते पनीरसारखे बनवू शकता. प्रोटीनसोबत कॅल्शियम आणि लोहदेखील टोफूत समाविष्ट असते. FDAच्या मते, १०० ग्रॅम टोफूमध्ये ९.४१ ग्रॅम प्रथिने असतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here