| | |

दररोज अक्रोड खा आणि निरोगी आरोग्य मिळवा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| सुका मेव्यातील अक्रोड ज्याला इंग्रजीमध्ये वॉलनट म्हणून ओळखले जाते, त्याचा अनेको पदार्थांमध्ये वापर केला जातो. जसे की, केक, कुकीज, चॉकलेट, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिम आणि अनेको मिठाई. अक्रोड दिसायला अगदी चित्रात पाहिलेल्या मेंदुसारखे दिसते. मजेची बाब म्हणजे अक्रोड खाल्ल्यामुळे अधिक लाभ मेंदूलाच होतो. याशिवाय अक्रोड खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर हे फायदे तुम्हाला माहित नसतील तर हा लेख पूर्ण वाचून जाणून घ्या. कारण अक्रोडाचे नियमित सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या दूर होतात.

० अक्रोड खाण्याचे फायदे –

  • ह्रदय विकाराचा धोका टळतो – अक्रोडामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे ह्रदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तसेच अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बॅड कोलेस्ट्रॉलदेखील वाढत नाही. परिणामी हृदयविकार होण्याचा धोका टळतो
  • वजनावर नियंत्रण – आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे वजनावर नियंत्रण ठेवणंं कठीण जातं. पुढे मग मधुमेह, रक्तदाब, ह्रदय समस्या निर्माण झाल्यास डॉक्टर तुम्हाला वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. मात्र अक्रोडामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे रक्तातील साखर वाढत नसल्यामुळे मधुमेहींनी अक्रोड खाण्यास काहीच हरकत नाही.
  • मेंदूचे कार्य सुधारते – मेंदूच्या आकाराप्रमाणे दिसणारे अक्रोड मेंदूसाठी अधिक लाभदायी आहे. कारण अक्रोडामध्ये असे काही आरोग्यदायी घटक असतात ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते. शिवाय निर्णयक्षमता, एकाग्रता यासाठीही फायदा होतो. शिवाय नैराश्याच्या समस्यांवर अक्रोड प्रभावी आहे.
  • कॅन्सरचा धोका कमी – अक्रोडमधील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सरच्या रोगापासून शरीर सुरक्षित रक्षण राहते. कारण अक्रोड मधील हे घटक कॅन्सरच्या विषाणूंना रोख लावतात.
  • पुरुषांच्या शूक्राणूंची संख्या आणि दर्जा वाढतो – अक्रोड खाणे पुरूषांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण यामुळे पुरुषांच्या शूक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढते. बऱ्याचदा स्पर्म काऊंट कमी असल्याने पुरूषांमध्ये वंधत्व वाढते.
  • केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक – अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई आणि प्रोटिन्स असतात. ज्याचा फायदा केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढण्यासाठी होतो. याशिवाय अक्रोडचे तेल चेहरा आणि केसांना आठवड्यातून एकदा लावल्यास चेहरा उजळ व केस दाट होतात.