Weightloss
| | |

भाकरी खाण्याचे नियम पाळालं तर झटपट वजन कमी करू शकाल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निश्चितच भाकरी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. पण भाकरी खाण्याचे काही नियम असतात ते तुम्हाला माहित आहेत का? नाही? मग माहित करून घेणे गरजेचे आहे. कारण, भाकरीबाबत आपल्या मनात असलेले गैरसमज वेळीच दूर होणे गरजेचे आहे. आपण भाकरीबाबत फक्त एवढेच जाणतो कि, रोजच्या आहारात पोळीपेक्षा भाकरी जास्त चांगली. याचे कारण म्हणजे, पूर्वीचे लोक भाकरी खात होते म्हणून त्यांची तब्येत चांगली होती असे अनेकांकडून आपल्या मेंदूवर आणि मनावर बिंबवले जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी वा मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्रास भाकरी खाल्ली जाते.

आता यांपैकी ज्वारी थंड म्हणून उन्हाळ्यात वा वर्षभर खाता येईल तर बाजरी उष्ण म्हणून थंडीच्या दिवसांत खाता येईल. शिवाय नाचणी, मका, तांदूळ यांसारख्या धान्यांच्या भाकऱ्या अगदी आवडीने कधीही खाल्ल्या जातात. देशाच्या विविध भागात भाकरी खणायची प्रमाण अधिक आहे. कारण कोलेस्टेरॉल, रक्तदाब, मधुमेह या आजारांवर नियंत्रण मिळवता येते असा एक लोकांमध्ये ग्रह आहे. आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी भाकरी खाणे फायदेशीर आहे. पण त्याचे नियम पाळणे त्याहून आवश्यक आहे. भाकरी कशी खावी? किती खावी? हे माहित करून घ्या अन्यथा भाकरी खाऊनही तुमच्या आरोग्याला फायदा होणार नाही. फायद्यासाठी भाकरी कशी खालं ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

भाकरीचा वजनाशी संबंध

१) भाकरीमुळे वजन कमी होते?
– चपातीपेक्षा भाकरीचा आकार मोठा असतो. चपातीसाठी साधारण 25- 30 ग्रॅम पीठ लागतं तर भाकरीसाठी 40- 50 ग्रॅम पीठ लागतं. आता भाकरीचा आकार पोळीपेक्षा मोठा असल्याने आपण प्रत्यक्षात जास्त खातो हे तुम्ही मान्य करा. त्यामुळे भाकरी खाल्ल्याने वजन कमी होत नाही. म्हणून वजन कमी करायचे असेल तर चपातीच्या आकाराची भाकरी खा.

चपातीपेक्षा भाकरी बरी..?

२) भाकरी पचायला चपातीपेक्षा हलकी असते?
– भाकरीमध्ये तेल नसते. पण चपातीच्या पीठात मळताना, घडी घालताना आणि पोळी झाल्यावर आपण वरुन तेल लावतो. भाकरीसाठी तेल लागत नाही म्हणून ती हलकी वाटते. पण त्यामध्ये धान्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे सगळी धान्ये पचायला सारखीच असतात. एक जड आणि दुसरे हलके असे काही नाही.  

विविध धान्याच्या विविध भाकऱ्या

३) प्रत्येक भाकरी गरजेची.
– ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका या प्रत्येक धान्याच्या पीठात वेगवेगळे गुणधर्म असतात. त्यामुळे प्रत्येक पीठाचा शरीराला वेगवेगळा फायदा होतो. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. तर गव्हामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. बाजरीत कॅल्शियम तर नाचणीत लोह आणि ज्वारीत बी कॉम्प्लेक्स जास्त प्रमाणात असते. 

मिश्र धान्याची चविष्ट भाकरी

४) मिश्र धान्याची भाकरी खा.
– कोणतीही भाकरी करताना एका पीठाची करू नका. शक्य झाल्यास दोन किंवा त्याहून अधिक धान्य एकत्र करून त्या पिठाची भाकरी खा. यामुळे भाकरीचे पोषण अधिक वाढते. शिवाय 2 धान्य एकत्र केल्याने त्याचा ग्लाायसेमिक इंडेक्स कमी होतो. डायबिटीस वा प्री डायबिटीक असणाऱ्यांसाठी ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रणात राहणे महत्त्वाचे असते. रस्ताही अशी भाकरी लाभदायक असते.

कधी चपाती, कधी भाकरी

५) एकवेळ चपाती..एकवेळ भाकरी.
– मित्रांनो दोन्ही जेवणावेळी चपाती किंवा दोन्ही जेवणावेळी भाकरी खाणे शरीराला आवश्यक ऊर्जा देईलच असे नाही. त्यामुळॆ कोणत्याही एका जेवणात पोळी आणि एका जेवणात भाकरी असे खा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गव्हामध्ये अधिक प्रोटीन असते. जे ज्वारी, बाजरीमध्ये कमी असते. त्यामुळे दोन्ही जेवणात भाकरी खाल्ल्यास शरीराला प्रोटीन मिळत नाही. म्हणून एका जेवणात चपाती आणि एका जेवणात भाकरी खा.