हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपली त्वचा म्हणजे जणू आपला जीव कि प्राणच. कारण चार चौघात उठून दिसायचं असेल तर नितळ आणि चमकदार त्वचा सवांचे लक्ष केंद्रित करून घेण्यास सहाय्य करते. शिवाय त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावर केलेला मेकअप देखील उठून दिसत नाही. त्यामुळे आपली त्वचा चमकदार आणि चांगली दिसावी याकरिता आपण नेहमीच विशेष काळजी घेत असतो. पण याकरिता महागडी औषधे किंवा क्रीम्स वापरण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे काही उपाय जे घरगुती देखील आहेत आणि सोप्पेसुद्धा.
१) केळी आणि कोरफडचा फेसपॅक – यासाठी आपल्याला अर्धी केळी, गुलाब पाणी, हळद, कोरफड आणि बेसन लागणार आहे. यात एका वाटीत २ मध्यम केळी स्मॅश करून त्यात अर्ध्या कोरफडीचा गर मिसळा. यानंतर वरील सर्व साहित्य त्यात मिसळून चांगली पेस्ट तयार करून घ्या. हा फेसपॅक साधारण अर्ध्या तासासाठी आपल्या चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुले चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम, पुटकुळ्यांपासून आराम मिळतो. शिवाय हा फेसपॅक दररोज वापरल्याने आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होण्यास मदत होईल.
२) केळी आणि लिंबूचा फेसपॅक – याकरिता १ अर्धे केळं स्मॅश करून त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि एक पेस्ट तयार करून घ्या. हा तयार फेसपॅक बाधित त्वचेवर किमान ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. यानंतर १५ मिनिटे हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर असाच ठेवा. त्यानंतर ताज्या व स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक दररोज वापरल्याने चेहऱ्यावरील डागांच्या समस्या दूर होतील.
३) कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक – यासाठी आपल्याला अर्धा कप कलिंगड आणि अर्धा कप काकडी यांचा रस लागणार आहे. हे दोन्ही रस एकमेकांत व्यवस्थितपणे मिश्रित करा आणि आपल्या चेहऱ्यावर किमान १० ते १५ मिनिटे ठेवा. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यासाठी मदत होते.
टीप :- फेसपॅक वापरण्याव्यतिरिक्त दररोज किमान १५ मिनिटे तोंडाचे व्यायाम करा. व्यायामामुळे त्वचेतील कोलेजेनचे उत्पादन सुधारते. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी वा गळणारी सैल त्वचा घट्ट होते व चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. शिवाय आपल्याला चमकणारी आणि निरोगी त्वचा प्राप्त होते.