If you have a sore throat in the cold of winter ....
|

हिवाळ्यात थंडीमुळे घसा खवखवत असेल तर ….

हॅलो  आरोग्य ऑनलाईन । हिवाळ्याच्या दिवसांत आजूबाजूचे वातावरण हे फार थंडीचे असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आपल्या तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे असते. आजूबाजूचे वातावरण हे फार थंडीचे असते. त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळणे आवश्यक आहे. हिवाळ्यात आंबट आणि थंड गोष्टींचे सेवन केल्याने घसा खवखवणे किंवा घसा खराब होऊ शकतो. आजूबाजूला कोरोनाची साथ आहे. त्यामुळे घसा जरी नॉर्मल खवखवत असेल तर अश्या वेळी आपल्या घशाची काळजी घेणे गरजेचे आहे. जर घसा खूप खवखवत असेल तर कोणत्या पद्धतीची काळजी हि घेतली पाहिजे हे जाणून घेऊया …..

—– गरम पाणी प्यावं

थंडीच्या दिवसांत आपल्या घश्याला आराम मिळण्यासाठी आयुर्वेदात गरम पाणी पिण्याचे महत्त्व आणि फायदे सांगितले आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीरात चरबीचे प्रमाण नियंत्रित होण्यासह पचन देखील चांगलं राहत. घशात कोणत्याही प्रकाराची खवखव असल्यास रात्री गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळणे करा.

—- सफरचंदाचे व्हिनेगर

गरम पाण्यात 2 चमचे सफरचंदाच्या व्हिनेगर ला मिसळून प्यायल्याने व्हिनेगर मध्ये असणारे अम्लीय गुणधर्म घशातील बेक्टेरिया चा नायनाट करतात. घशातील खवखव दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चमचा मीठ आणि एक चमचा सफरचंदाचे व्हिनेगर मिसळून गुळणे करा.

— तुळशीचा काढा

तुळशीचा काढा बनविण्यासाठी एक कप पाण्यात काही प्रमाणात काळी मिरी आणि तुळशी चे काही पाने घालून उकळवून काढा बनवा आणि या काढ्याला रात्री झोपण्याच्या पूर्वी प्यावं. या मुळे फायदा होईल.

दुधाचा काढा —

आपल्याला जर घश्याला त्रास होत असेल तर अश्या वेळी आपल्या घश्याला आराम मिळण्यासाठी दुधाचं काढा त्याच्यामध्ये हळद टाकून पिला जावा. त्यामुळे घश्याला आराम मिळेल.