| | |

पडत असेल टक्कल तर लावा जरा शक्कल आणि वापरा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। टक्कल पडणे हि समस्या आजकाल अतिशय सामान्य झाली आहे. पुरुषांइतक्याच आता महिलासुद्धा टक्कल पडण्यामुळे त्रस्त झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार. अश्या विविध कारणांमुळे टक्कल पडते. तर अश्या समस्यांवर प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज माही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही दाट केस मिळवू शकता. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) स्कॅल्पला मसाज करा – आपल्या केसांसाठी आपल्या स्कॅल्पची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या स्कॅल्पला नियमितपणे बोटांच्या साहाय्याने मसाज करा. यामुळे गेलेल्या केसांच्या रोमछिद्रामध्ये रक्तसंचार होतो आणि नवीन केस उगण्यास मदत होते.

२) केसांना तेलाने मालिश करा – केसांच्या मुळाशी तेल मालिश केल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. तेलामुळे केसांना आवश्यक पोषक घटक मिळतात आणि केसांचे खोलवर पोषण होऊन केसांचे आरोग्य सुधारते. परिणामी गेलेल्या केसांची रोमछिद्र मोकळी होतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. केसांची तेल मालिश करण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेलाचा वापर करावा. नवीन केस उगण्यासाठी बदाम तेल जास्त उपयुक्त आहे. कारण बदाम तेलात व्हिटॅमिन E वे प्रमाण अधिक असते.

३) कांद्याचा रस – टक्कल पडत असल्यास त्यावर नवीन केस येण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरतो. कांद्याचा रस केस गेलेल्या ठिकाणी लावल्याने त्या ठिकाणचे रक्तसंचरण सुधारते आणि केस येतात. यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून १५ मिनिटांनी केस धुवून घ्यावेत.

४) खोबरेल तेल, कांदा आणि लसूण – वाटीभर खोबरेल तेलात ३ चमचे एरंडेल तेल आणि ४ ते ५ लसूण पाकळ्या व थोडासा कांदा बारीक करून घाला. आता हे मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे गरम करून घ्या. हे मिश्रण थोडे कोमट झाल्यावर केसांच्या मुळाशी लावा. या तेलाने केसांना नियमित मालिश केल्यास केस गळणे कमी होते, केस घनदाट होतात आणि नवे केस येण्यास मदत होते.

५) कोरफडीचा गर – केस गळतीवर कोरफडीचा गर फायदेशीर आहे. शिवाय कोरफडीचा गर केसांना लावल्यास नवीन केस येण्यासाठी, केस मजबूत व घनदाट होण्यासाठी अतिशय फायदा होतो. आठवड्यातून २ ते ३ वेळा कोरफडीचा गर लावल्यास लगेच फरक जाणवतो.

६) अंड्याचा हेअरमास्क – अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन, जस्त, सल्फर, लोह, फॉस्फरस और आयोडीन हि तत्वे समाविष्ट असतात. हि सर्व तत्त्व आपल्या केसांसाठी पोषकतत्वे देणारी आहेत. म्हणून टक्कल पडण्याची शक्यता असल्यास अंड्याच्या हेअर मास्कचा आठवड्यातून एकदा वापर करावा. यासाठी दोन अंड्यांचा पिवळा भाग काढून आतील पांढऱ्या भागाचा गर केसांना १५ मिनिटांसाठी लावा. यानंतर केस धुवून घ्या. यामुळे केस मजबूत व दाट होण्यास मदत होते. शिवाय गेलेले केस पुन्हा येण्यासही मदत होते.

७) योग्य आहार घ्या – केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचं आहे. म्हणून प्रोटिन्स, ओमेगा 3 फॅटी एसिड, व्हिटॅमिन्स, खनिजे समाविष्ट असणारा आहार घ्या. विशेषतः पुरेसे प्रोटीन मिळेल असा आहार घ्या. यामध्ये दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे, सुखामेवा, मोड आलेली कडधान्ये खावीत. शिवाय आहारात पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचाही समावेश करा. तसेच नवीन केस येण्यासाठी बायोटिन घटक व ओमेगा-3 फॅटी एसिड असणारे पदार्थ आहारात घ्या. जसे कि, अंड्यातील पिवळा भाग, मांस, मासे, मोड आलेली कडधान्ये व सुखा मेवा

८) कैमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्सचा वापर टाळा – शॅम्पूमध्ये अनेक रासायनिक घटक असतात. ज्यामुळे आपल्या केसातील प्राकृतिक तेल निघून जाते. परिणामी केस कोरडे व नाजूक बनतात. मग काय? केसगळती आणि टक्कल या समस्या उदभवतात. म्हणून जर या समस्या रोखायच्या असतील तर केमिकल्युक्त हेअर प्रोडक्ट वापरणे टाळा. याऐवजी सौम्य वा हर्बल शॅम्पू वापरा.