| | |

आहारात असतील काळे तीळ, तर अनुभवाल निरोगी आयुष्याचा फील; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना पांढरे तीळ माहित आहेत. मात्र काळे तीळ जाणणारे आणि खाणारे फार कमी लोक आहेत. इतकेच नव्हे तर काळ्या तिळाचा आपल्या आरोग्याशी असलेला संबंधदेखील अनेकांना ठाऊक नाही. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार काळे तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कारण काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे शरीराला पोषक असणारे अनेक घटक असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत कि, काळ्या तिळाचा आपल्या आहारात समावेश केल्याने कोण- कोणते फायदे होतात.

काळ्या तिळाचे आरोग्यवर्धक फायदे:

– ताण तणावापासून मुक्ती
काळ्या तिळाचे दररोज सेवन केले असता शरीरात नकारात्मकता आणि मानसिक थकवा निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो आणि ताण तणावापासून मुक्ती मिळते.

– बौद्धिक क्षमता व स्मरणशक्ती वाढविण्यासाठी
सकाळी रिकाम्या पोटी काळे तीळ आणि मध एकत्र खाल्ल्याने आपल्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते शिवाय स्मरणशक्ती तल्लख होते. मात्र, तीळ आणि मध एकत्र खाल्ल्यावर किमान १ तास अन्य काहीही खाणे टाळावे.

– हृदयासाठी फायदेशीर
दररोज १० ते १५ काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या कच्च्या दुधासह घेतल्यास हृदयाचे रोग होण्याचा धोका टळतो. शिवाय बीपी नियंत्रित राहतो.

– रक्ताभिसरण
काळ्या तिळाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते.

– वजनात घट
काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवावे. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खावे. यामुळे आपल्या पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

– मुळव्याधीपासून आराम
दररोज २ चमचे काळे तीळ चावून खाणे आणि त्यावर थंड पाणी पिणे. असे केल्याने अगदी जुन्यातला जुना आणि गंभीर मूळव्याध समूळ दूर होण्यास मदत होते.

– दृष्टी वाढ
काळ्या तिळाचे सेवन आपली दृष्टी चांगली करण्यास मदत करते. शिवाय डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असेल तर अश्या व्यक्तींना विशेष करून काळ्या तिळाचा आहारात समावेश करावा.

– केसांसाठी
ज्यांना तेल लावायला आवडत नाही ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा- ३ चे पोषक घटक असतात जे केसांसाठी फायदेशीर हातात.

– जखमा लवकर भरणे
काळ्या तिळामध्ये अँटीबॅक्टरील घटक असतात ज्यामुळे कोणत्याही जखमा लवकरात लवकर भरून निघतात. शिवाय स्नायूंवर सूज येण्याच्या समस्यांपासून अराम, मिळतो.