South Indian Dishes
| | |

असा नाश्ता कराल तर दिवसभर तुमची बॅटरी पुन्हा चार्ज करावी लागणार नाही; जाणून घ्या पौष्टिक नाश्त्याचे प्रकार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळचा नाश्ता अत्यंत गरजेचा आहे. पण नुसताच नाश्ता काय करायचा? रोज तेच तेच. त्यात काहीतरी वैविध्यता, वेगळेपण आणि पौष्टिकताही जपायला हवी ना. मुळात सकाळचा नाश्ता अर्थात न्याहारी हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आयुर्वेदात तर ब्रेकफास्टचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. यामुळे डॉक्टरसुद्धा ब्रेकफास्ट चुकवू नये असे सांगतात. पण नाश्ता कसा असावा तर शरीराला ऊर्जा आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वं पुरवणारा असावा. आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी दिवसभर उच्च ठेवायची असेल, प्रोटिनयुक्त आरोग्यदायी ब्रेकफास्ट हवा असेल, तर त्यासाठीचे पर्याय काय? जाणून घ्या रोजच्या नाश्त्यासाठी उत्तम आणि पौष्टिक पर्याय खालीलप्रमाणे:-

१) इडली – इडलीसारख्या पदार्थांत आंबवण्याची प्रक्रिया होते. यामुळे शरीराला अनेक गोष्टींचा लाभ होतो. आपल्या शरीराची प्रोटिन आणि व्हिटॅमिनची गरज इडलीसारख्या पदार्थांमुळे भागवली जाते. त्यामुळे आंबवलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या नाश्त्यात असणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

२) डोसा – डोसा हा एक पौष्टिक नाश्ता आहे. जो आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर यांसारखे शरीरासाठी आवश्यक असणारे घटक प्रदान करतो.

३) पोहे – आपल्याकडे पोहे हा नाश्ता अत्यंत प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय आहे. पोहे चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण यात फायबर, लोह आणि कमी कॅलरी असतात. यामुळे हा एक निरोगी नाश्ता आहे. ज्यांना डायबेटिस, मधुमेह आहे त्यांच्यासाठी पोहे हा नाश्ता उत्तम आदर्श पर्याय आहे.

४) खिचडी – ज्याच्या त्याच्या आवडीनुसार बनवली जाणारी खिचडी हि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. खिचडीत विविध प्रकारच्या भाज्या, योग्य प्रमाणात मसाले घातले तर खिचडीची चव वाढतेच पण तिच्या पौष्टिकपणातही खूप वाढ होते.

५) पराठा – पराठा हा प्रकार पंजाब इतकाच आपल्याकडे आवडीने खाल्ला जातो. अतिशय खुसखुशीत, करायला सोपा आणि भरपूर पौष्टिक घटक असलेला हा उत्तम ब्रेकफास्ट आहे. पराठ्यातून आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर्स मिळतात.