| |

झोपेबाबत असेल तक्रार तर जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे झोप न येणे, अर्ध्यातून झोप तुटणे अश्या प्रकारच्या झोपेबाबत तक्रारी असणे अगदी सामान्य झाले आहे. तक्रार असे म्हणण्याचे कारण म्हणजे झोप न येणे हि समस्या असू शकते मात्र आजार नाही. नैराश्य, एंग्झायटी, फुप्फुसांशी निगडीत आजार असलेल्या रुग्णांना हा त्रास प्रामुख्याने जाणवतो. याचे अनेक दुष्परिणामदेखील आहेत. यात विस्मरण होणे, निर्णय क्षमतेत घट, वजन वाढ अशा समस्यांचा समावेश आहे. यामुळे आरोग्यास होणारी हानी सर्वांना ठाऊक तर आहे पण तरीही सगळे याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. म्हणूनच आज या समस्येची लक्षणे आणि उपचार आपण पाहणार आहोत.

  • झोपेच्या तक्रारीची प्रमुख लक्षणे :-

१) झोपेच्या वेळेत घट होणे – प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज वेगवेगळी असते. काहीं ४ ते ६ तास इतकी झोप पुरेशी असते त्यांना शॉर्ट टर्म स्लीपर म्हणतात. तर काहींना ८ ते १० तास झोप आवश्यक असते त्यांना लाँग टर्म स्लीपर म्हणतात. साधारण ४ ते ६ तास झोप घेणाऱ्यांच्या झोपेची वेळ घटून १ किंवा २ तासांवर आली आणि ८ ते १० तास झोप घेणाऱ्यांच्या झोपेची वेळ घटून ५ ते ६ तासांवर आली तर झोपेबाबत समस्या असल्याचे हे एक मुख्य लक्षण आहे.

२) झोपेत खंड पडणे – सलग २ ते ३ आठवडे एखादा माणूस ८ ते १० तास झोपणारा त्याच्या झोपेदरम्यान ४ ते ५ वेळा अचानक जागा होत असेल तर यालाही झोपेच्या समस्यांपैकी एक लक्षण मानले जाईल.

३) झोपेच्या वेळेत विस्कळीतपणा – काही लोक बिछान्यात खूप तास पडून राहिले तरच त्यांना झोप येते. दरम्यान ते या कुशीवरून त्या कुशीवर करत अर्धी रात्र काढतात. याला इनिशियल इन्सोम्निया म्हणतात. तर काही लोकांना चटकन झोप येते पण ते रात्री मध्येच खट्ट जाग आल्याने उठतात. याला ‘मिडल इनसोम्निया’ म्हणतात. शिवाय ज्या लोकांची झोप सकाळ उजाडण्याआधीच संपते किंवा तुटते, याला ‘टर्मिनल इनसोम्निया’ असे म्हणतात. हे प्रकार म्हणजेच निद्रानाश किंवा झोपेच्या समस्येचे मोठे व गंभीर लक्षण आहे.

टीप : या तीनपैकी कोणतेही लक्षण प्रदीर्घ काळ जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

  • झोपेच्या तक्रारींवर उपचार काय?

१) रात्रीच्यावेळी खूप जास्त आणि जड जेवण करू नका.

२) झोपण्याआधी किमान दोन तास कोणतेही गरम पेय अर्थात चहा – कॉफी यांचे सेवन करू नका.

३) झोपण्यासाठी एखादी जागा पक्की करा. त्याठिकाणी खाणेपिणे, अभ्यास करणे किंवा खेळणे टाळा.

४) दिवसाच्यावेळी डुलकी काढायची असेल तर त्यासाठी आरामाची जागा म्हणजे दिवाण किंवा पलंग पाहून पहडू नका.

५) झोपण्याआधी दोन ते तीन तास कोणताही डिजिटल स्क्रीन अर्थात स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅब, टीव्ही यांचा वापर करू नका.

६) झोपण्याआधी ध्रूमपान (Smoking) करू नका.

७) दैनंदिन कामांचे वेळापत्रक निश्चित करा व ते पाळण्याचा प्रयत्न करा. जेवणे, झोपणे, उठणे आणि व्यायाम करणे यांच्या वेळा चुकवू किंवा सारख्या बदलू नका.

८) झोपल्यानंतर अधून मधून सतत लघवीला जावे लागत असेल तर योग्य वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्वाचे : वरील गोष्टींचे पालन करूनही झोपेच्या समस्या दूर होऊन झोप लागत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.