Kidney Beans
| | |

राजमा खाताय..?थांबा.. जर ‘हे’ आजार असतील तर खाऊ नका अन्यथा..,; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्ही कधी राजमा खाल्ला आहे का.? आता तुम्ही म्हणाल हेह.. काय प्रश्न आहे..? राजमा खाल्लाय का.. राजमा कोण खात नाही.? अहो ‘राजमा-चावल’ नुसतं नाव ऐकलं तरीही तोंडाला अगदी पाणी सुटत. त्यामुळे राजमा खाना तोह बनता है। याचे आणखी एक कारण म्हणजे चवीप्रमाणे राजमा पौष्टिक देखील आहे. तो कसा..?

तर राजमामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, स्लो रिलीझ होणारे कार्बोहायड्रेट, आयर्न, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि फोलेट इत्यादी मुबलक प्रमाणात असते. जे ब्लड शुगर, चयापचय, कर्करोग प्रतिबंध, वजन कमी करणे, मधुमेह दूर करण्यास मदत करते. मात्र इतका पोषक घटकांनी भरलेला राजमा सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असेलच असे नाही. राजमामुळे काही लोकांना हानी पोहोचू शकते. हे लोक कोण..? आणि त्यांना हानी का पोहोचेल हे आज आपण जाणून घेऊ. अर्थात कोणत्या लोकांनी राजमा खाऊ नये ते जाणून घेवूयात…

या लोकांनी राजमा खाणे टाळावे

१. शरीरात आयर्नची मात्रा जास्त असणे –

राजमामध्ये भरपूर आयर्न असते. यामुळे तुमच्या शरीरात आयर्न आधीच जास्त असेल तर राजमा खाल्ल्याने आयर्नची मात्रा वाढू शकते परिणामी आरोग्याचे नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत राजमा खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या अशा समस्या निर्माण होतात.

२. पित्त दोष असणे –

जर तुम्हाला पित्तदोषाची समस्या आहे तर राजमा खाणे टाळा. कारण राजमा खूप उष्ण प्रभाव पाडतो. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना राजमा खाल्ल्याने पित्ताच्या उलट्या होऊ शकतात.

३. पोटाच्या समस्या असणे –

ज्या लोकांना पोटाच्या कोणत्याही समस्या असतील जसे कि पोटात गॅस, दुखणे, मुरडणे, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्या होत असतील तर त्यांनी राजमा खाणे टाळा. कारण राजमातील फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.

४. बद्धकोष्ठतेची समस्या –

राजमा पचायला जड असतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. शिवाय राजमातील फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते.

५. गरोदर स्त्रिया –

गरोदरपणात स्त्रियांनी राजमा खाणे आई आणि बाळ दोघांसाठी फायदेशीर असले तरीही जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्टोन, संधिवात, गॅस आणि क्रॅम्प्सचा त्रास संभवतो. त्यामुळे गरोदरपणात राजमाचे सेवन मर्यादित करावे.

६. वजन कमी असणे –

राजमामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. परिणामी लवकर भूक लागत नाही. याचा फायदा वजन कमी करणाऱ्यांना होतो. पण जर तुम्हाला वजन वाढवायचे आहे वा तुम्ही खूप बारीक आहात तर राजमाचे सेवन मर्यादित करा.