CauliFlower
| |

जर तुम्हाला असतील ‘हे’ आजार तर आहारात फ्लॉवर नकोच, अन्यथा..; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजची धावपळ, दैनंदिन जीवनशैली आणि दिवसभरातील आहार याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आपला आहार सकस आणि पौष्टिक असेल तर याचा नक्कीच चांगला फायदा होतो. आहार तज्ञ सांगतात कि आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश नेहमीच लाभदायी ठरतो. पण काही भाज्या अशाही असतात ज्या खाल्ल्याने कदाचित तुमच्या आरोग्यात बघाड होऊ शकतो. कारण प्रत्येकाच्या शरीराची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे याला जी भाजी फायदेशीर आहे ती त्यालाही असेलच असे काही नाही.

सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. या हंगामात बऱ्याच भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. यामध्ये मटार, गाजर, कोबी आणि फ्लॉवरचा समावेश आहे. यातील फ्लॉवर फुलकोबी म्हणून देखील ओळखला जातो. तसे पाहाल तर फ्लॉअर कोणत्याही हंगामात सहज बाजारात उपलब्ध असतो. मात्र हि भाजी हिवाळी भाज्यांपैकी एक आहे. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि लोह भरपूर प्रमाणात असते. याशिवाय व्हिटॅमिन ए, बी, सी आणि पोटॅशियमदेखील भरपूर असते. मात्र तरीही हि भाजी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे असे नाही. काही आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हि भाजी खाणे धोकादायक ठरू शकते. म्हणून आज आम्ही तुम्हाला या आजारांविषयी सांगणार आहोत. जर तुम्हालाही हे आजार असतील तर फ्लॉवर खाणे टाळा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) अॅसिडिटी – ज्या लोकांना पोटात गॅस तयार होण्याची समस्या आहे, त्यांनी फ्लॉवरचे कोणत्याही रूपात सेवन करणे प्रामुख्याने टाळावे. कारण फ्लॉवरमध्ये कर्बोदके भरपूर असतात. यामुळे अॅसिडिटीची समस्या वाढते.

२) थायरॉईड – ज्या महिला वा पुरुषांना थायरॉइडची समस्या असेल त्यांनी फ्लॉवरचे सेवन करू नये. कारण अश्या व्यक्तींनी फ्लॉवरचे सेवन केल्यास शरीरातील T3 आणि T4 हार्मोन्स वाढतात. परिणामी हायपर थायरॉइडची शक्यता आहे.

३) मूत्रपिंडाच्या समस्या – मूत्रमार्गात कोणतीही समस्या असल्यास अशा लोकांनी आहारात फ्लॉवरचे अजिबात सेवन करू नये. कारण फ्लॉवरचे सेवन केल्याने मूत्राशयातील मूत्रपिंडाची समस्या गंभीर प्रमाणात वाढते. याशिवाय यूरिक ऍसिडची पातळीदेखील वेगाने वाढते.

४) किडनी स्टोन – ज्यांना पित्त, मूत्राशय वा किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी फ्लॉवरचे सेवन करणे टाळावे. कारण फ्लॉवरमधील कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण आहे त्याहून जास्त वाढते. परिणामी गंभीर त्रास होऊ शकतात