रोजच्या आहारात असेल तूरडाळ तर मिळतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय खानपान आहार पद्धतीमध्ये डाळींचा विशेष समावेश आहे. यात अनेक भागांमध्ये प्रामुख्याने तूर डाळ खाल्ली जाते. तूर डाळ चवीने उत्कृष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. कारण तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणार्या व्यक्तीला फायदा होतो. त्यामुळे अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुर डाळ खाल्ल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळते. याशिवाय गर्भवती महिलांनी तुरीच्या डाळीचे सेवन करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. कारण प्रसुती संदर्भातील विकार दूर करण्यास तुरीची डाळ मदत करते आणि गर्भावस्थेत तुरीची डाळ खाल्ल्यामुळे ७६% टक्के फोलेटची पूर्तता होते. चला तर जाणून घेऊयात तूरडाळ खाण्याचे आरोग्यवर्धक लाभ खालीलप्रमाणे:-
१) इम्युनिटी बुस्टर – तुर डाळीमुळे शरीरातील सी जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते. यासाठी कच्चे तुरीचे दाणे चावून खाल्ल्यास अधिक लाभ होतो. तुरीची डाळ शिजवल्यानंतर त्यात सी जीवनसत्त्व केवळ २५% शिल्लक राहते. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर तुरीची कच्ची डाळ खाणे अधिक उत्तम.
२) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी चांगली रोग प्रतिकारक शक्ती असणे महत्त्वाचे आहे आणि तूर डाळीत मॅग्नेशियम असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
३) मेंदूसाठी मदतयुक्त – तूर डाळ कर्बोदकांमधे चांगला स्रोत मानली जाते. मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी कार्बोहायड्रेट्स समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करणे खूप चांगले असते. ज्यामुळे तूर डाळ लाभदायक
४) पचनविषयक समस्यांवर प्रभावी – तूर डाळीत आढळणारे फायबर पाचन आरोग्यासाठी लाभदायक असते. यामुळे तूर डाळ खाल्ल्यास आंत्र हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या पाचन समस्या दूर होतात.
५) मधुमेहात फायदेशीर – तूर डाळीमध्ये २९चे ग्लायसेमिक इंडेक्स आहे. जे मधुमेहामुळे ग्रस्त लोकांसाठी योग्य मानले जाते. ही डाळ कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत असल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. शिवाय तूर डाळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेमध्ये तीव्र चढ -उतार होत नाही.
६) वजनावर नियंत्रण – तुरीच्या डाळीत पोषक घटकांचे व प्रथिनांचे प्रमाण अधिक असते आणि कोलेस्ट्रॉल, सोडियम, सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल हि डाळ मदत करते.