| |

दोडक्याचे औषधी गुणधर्म जाणाल, तर नको ग बाई म्हणणे विसरून जाल; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दोडका ही फळभाजी सर्वत्र आढळते. ही भाजी मुळ सपक चवीची असते. यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही. तिची चव वाढवण्यासाठी भाजीत बरेचसे मसाले वापरले जातात. तरीही ती फारशी लोकप्रिय नाही. पण आम्ही तुम्हाला दोडक्याचे असे औषधी गुणधर्म सांगणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर अगदी ‘दोडका? नको ग बाई’ म्हणणारेसुद्धा चवीचवीने हि भाजी खातील.
चला तर जाणून घेऊयात दोडक्याची आरोग्यवर्धक फायदे:-

१) डोळ्यांचे आरोग्य – डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दोडका अत्यंत गुणकारी आहे. दोडक्यामध्ये बिटा कॅरेटीन आणि विटामीन ए भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. यामुळे दोडक्याची सेवन केले असता उतारवयात दृष्टिदोष होण्याची शक्यता कमी होते.

२) बद्धकोष्ठता – दोडक्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्याचा पांढरा भाग सेल्युलोजने (फायबरचा प्रकार) बनलेला असतो. ज्यामुळे पचनक्रियेस मदत होते आणि पचनासंबंधित समस्या कमी होतात. यासाठी दोडक्याचा एक चमचा रस मध घालून घेण्याने अपचनाच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो.

३) रक्तशुद्धी – टॉक्सिन्स्, ऑक्सिडंट्स, अल्कोहोल, न पचलेले अन्न ह्यामुळे आपल्या शरीरात निर्माण होणारी अशुद्धी दूर करून रक्त शुद्ध करण्यासाठी दोडका लाभदायक आहे. कारण दोडक्यामध्ये रक्तशुद्धीचे गुणधर्म देखील आहेत.

४) यकृतकार्य सुधार – दोडक्यात पाण्याचे प्रमाण संतुलित असते. शिवाय त्यात आढळणारे रक्तशुद्धीकरण करणारे घटक यकृताचे कार्य देखील प्रभावित करते. शरीरात होणारा पित्तरसाचा स्त्राव नियंत्रणात करण्यासाठी देखील दोडका उपयुक्त ठरतो आणि काविळीवर दोडका म्हणजे रामबाण उपाय.

५) वजन नियंत्रण – दोडक्यामध्ये कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅटस् आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अतिशय कमी असते. यामुळे दोडका शरीरातील प्रोटीन, कार्बस् आणि फॅटचे विघटन करण्यास मदत करतो आणि शरीरात मेद साठू देत नाही. शिवाय पचनास मदत करतो आणि रक्तातील साखरदेखील नियंत्रणात ठेवतो. यामुळे आपोआपच आपले वजन नियंत्रित राहते शिवाय वाढलेले वजन कमीदेखील होते.

५) ऍनिमिया – दोडका हा ऍनिमियाच्या आजारावर अत्यंत गुणकारी आहे. कारण दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते. शिवाय त्यात विटामीन बी-६ असल्यामुळे तांबड्या रक्त पेशींचे प्रमाण वाढते. परिणामी शरीरातील सर्व अवयवांपर्यंत रक्तपुरवठा सुरळीतपणे होण्यास मदत होते.

विशेष : आशिया खंडात सर्वात जास्त प्रमाणात दोडक्याची वेल आढळते. हि वेल साधारण ९ मी. उंचीपर्यंत वाढते. त्याला आधी पिवळ्या रंगाची फुले लागतात. त्यानंतर हिरव्या रंगाचे आणि लांबट आकाराची फळ येतात. त्यालाच आपण दोडका असे म्हणतो आणि त्याचा भाजी म्हणून वापर केला जातो.