| |

काकडीचा असा फेस पॅक बनवाल, तर पार्लरमध्ये जाणं सोडून द्याल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपली त्वचा सुंदर, डागरहित आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असावी म्हणून आपण काय काय प्रयोग करतो. आठवड्यातून तीन तीन वेळा पार्लरमध्ये जातो आणि तरीही त्वचा मेकअपशिवाय निस्तेज दिसते. जर तुमच्याही बाबतीत असे होत असेल, तर आता पार्लरचा रस्ता विसरून जा. कारण आम्ही तुम्हाला काकडीचा वापर करून घरच्या घरी बनवता येईल असे सोप्पे फेसपॅक सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुमची त्वचा टवटवीत, डाग रहित आणि नैसर्गिक चमकयुक्त दिसेल.

काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ल्यूटिन, झेक्सॅन्थिन आणि कॅरोटीन यांसारखे अँटीऑक्सिडंट्स समाविष्ट असतात. त्यामुळे काकडी आपल्या शारीरिक आरोग्यासह आपल्या त्वचेचे आरोग्य राखण्याशी मदतयुक्त असते. त्यामुळे काकडीपासून अनेक उत्तम फेसपॅक घरगुती पद्धतीने काही पदार्थांचा वापर करून बनविले आणि चेहऱ्यासाठी वापरले तर सौंदर्य मिळविण्यासाठी विशेष पार्लरमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही.

१) काकडी आणि मुलतानी मातीचा फेसपॅक
– मुलतानी मातीचा सौंदर्य मिळविण्यासाठी विशेष वापर केला जातो. त्यामुळे मुलतानी मातीसह काकडीचे गुणधर्म मिसळले असता सोप्प्या पद्धतीने सौंदर्य मिळविता येते. या फेसपॅकसाठी १ चमचा गुलाब पाणी, २ चमचे काकडीचा रस आणि १ चमचा मुलतानी माती एकत्र मिसळा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा आणि यानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात. शिवाय मुरुमांची समस्या नाहीशी होते.

२) काकडी आणि कोरफडीच्या गराचा फेसपॅक
– हा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला उजळ आणि डाग रहित बनविण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यासाठी १ चमचा ताज्या कोरफडीचा गर आणि पाव चमचा किसलेली काकडी एकमेकांत व्यवस्थित मिसळा आणि आपल्या मानेवर व चेहऱ्यावर लावा. यानंतर हा पॅक १५ मिनिटांसाठी असाच ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकला. याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील थकवा मिनिटांत नाहीसा होतो आणि चेहरा टवटवीत एकदम फ्रेश दिसतो.

३) काकडी आणि बेसनचा फेसपॅक
– हा फेसपॅक अगदीच सोप्पा आहे. कारण बेसन बहुतांशी घरात सहज उपलब्ध होणार पदार्थ आहे. यासाठी २ चमचे बेसन आणि २ चमचे काकडीची बारीक पेस्ट व्यवस्थित एकमेकांत मिसळून मानेवर आणि चेहऱ्यावर साधारण अर्धा तास अशीच ठेवा. यानंतर चेहरा अगदी स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील डाग आणि निस्तेजपणा निघून जातो.

४) काकडी आणि टोमॅटोचा फेसपॅक
– टोमॅटोमध्ये त्वचा तजेलदार बनविणारे घटक समाविष्ट असतात. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. यासाठी एक अर्धा पिकलेला टोमॅटो आणि सोललेल्या काकडीचा पाव भाग एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. या पेस्टने चेहऱ्याच्या त्वचेवर साधारण मिनिटभर मालिश करा आणि त्यानंतर १५ मिनिटे असेच सोडा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.