| | |

पाणी पिताना ‘या’ ५ चुका केल्या तर होईल खूप नुकसान!

हॅलो आरोग्य ऑनलाइन । तहान लागण्यापूर्वी पाणी पिणं आवश्यक आहे. तहान लागण्याचा अर्थ असा की, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. म्हणून तहान लागण्यापूर्वीच पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. शरीरात पाण्याची कमतरता असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे आपण सगळेच जण जाणतो. परंतु आपणास हे माहित आहे का की, पाणी पिण्याची पद्धत जर योग्य नसेल तर ते देखील खूप हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे पाणी कधी आणि कसं प्यायला हवं हे देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बर्‍याच वेळा आपण पाणी कसे प्यावे हे आपणास माहित नसतं. पाणी कसं प्यावं याबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण त्यापैकी कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या अयोग्य हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

पाणी पिण्याचे योग्य पर्याय कोणते?
1. उभे राहून कधीही पाणी पिऊ नये: आपण नेहमीच ऐकले असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. पण बऱ्याच जणांना या मागचं नेमकं कारण माहित नसेल. वास्तविक, उभं राहून पाणी प्यायल्यास ते घशातून थेट पोटातील खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील आवश्यक असे पोषकद्रव्य शरीराला मिळत नाही.
2. सकाळी रिकाम्या पोटी भरपूर पाणी पिऊ नका: सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. पण पाण्याचं प्रमाण हे एक लिटर पेक्षा देखील कमी असावं. परंतु लक्षात ठेवा की, जर एखाद दिवशी आपण अचानक सकाळी एक लिटर पाणी पिल्यास ते खूप हानीकारक ठरु शकतं.
3. खाण्याबरोबर पाणी पिणे हानिकारक: जर तुम्हाला खाण्याबरोबरच पाणी पिण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. वास्तविक, अन्नाबरोबर पाणी प्यायल्यामुळे पोटातील गॅस वाढतो अन्न पचन होण्यास त्रास होतो. म्हणून, खाण्यापूर्वी अर्धा तास किंवा नंतर पाणी प्यावे.
4. व्यायाम आणि कसरत दरम्यान पाणी कसं प्यावं?: व्यायामाच्या वेळी किंवा वर्कआउट करताना दरम्यान तुम्ही किती पाणी पितात आणि ते कसे पिता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. व्यायाम करताना तहान लागणं हे स्वाभाविक आहे. परंतु जर आपण एका घोटापेक्षा अधिक पाणी प्याल तर ते खूप हानिकारक ठरु शकतं. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर किमान एक तासानंतर पाणी प्यावे. एक-एक घोट पाणी प्याल्यास डिहायड्रेशन होणार नाही.
5. फ्रिजमधील थंड पाणी घटाघट पिऊ नये: जर तुम्हाला थेट फ्रीजमधून बाटली घेऊन घटाघट पाणी पिण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोहचवू शकते. अशाप्रकारे पाणी पिण्याची सवय ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्याऐवजी मटक्यातील पाण्याचा वापर करावा कारण हे पाणी नैसर्गिकरीत्या थंड झालेले असते.