If you start the day with a regular tea ...
|

दिवसाची सुरुवात अनुश्यापोटी चहा घेऊन करत असाल तर…

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सकाळच्या वेळेत चहा नाही घेतला तर अनेकांची कामे हि होत नाहीत चहाची सवय हि इतक्या मोठ्या प्रमाणात असते , कि चहा न पिल्याने कोणतेच काम उत्साहाने करण्याची इच्छा निर्माण होत नाही. आजकाल सगळेच लोक उठल्या उठल्या उ चहा घेतात. ती त्याची इच्छा हि सवय कधी बनून जाते हे त्यांनाच कळत नाही. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनोश्या पोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊया….

—– पचनाशी निगडित समस्या उद्भवतात

सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात. त्यामुळे आपल्या शरीरात पित्ताचे प्रमाण हे वाढत जाते. जर शरीरात असलेले आतड्याचे बेक्टेरिया पचन तंत्राला बळकट करण्याचे काम करतात. पण जर तुम्ही अनोश्यापोटी चहा घेत असाल तर मात्र चहातील कॅफिन मुळे आतड्यातील बेक्टेरियाला नुकसान होते, ज्यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.

—— तोंडाचा वास येतो.

सकाळी अनोश्यापोटी चहाचे सेवन केल्यानं तोंडाच्या आरोग्याला देखील नुकसान होतो. या मुळे तोंडातून घाण वास येतो. जर आपल्याला देखील ही सवय आहे. तर ही सवय लगेच बदला. तसेच चहा घेतल्याने लगेच चूळ भरली गेली पाहिजे.

— लघवी जास्त प्रमाणात येते

दिवसाची सुरुवात चहा ने करणाऱ्यांना लघवी जास्त प्रमाणात येऊ लागते. लघवी जास्त प्रमाणात येऊ लागल्यानं शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते. या मुळे अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.

—– भूकच लागत नाही.

जर आपल्याला भूक लागत नसेल तर समजून जावे, कि आपल्या आहारात चहाचा वापर हा जास्त केला जात आहे. चहा मुळे आरोग्याच्या समस्या या निर्माण तर होतात तसेच भूक सुद्धा अजिबात लागत नाही. भूक न लागण्याने आपल्याला अशक्तपणा जाणवायला सुरुवात होते.

— ऍसिडिटीचा त्रास होतो.

सकाळी अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं ऍसिडिटीची समस्या होते. जर आपण देखील सकाळी उठल्यावर चहा पिण्याची आवड ठेवता तर आजच ही सवय सोडा. तसेच प्रवासाला जाताना जर तुम्ही चहा पिऊन निघत असाल तर मात्र ते चुकीचे आहे. त्यामुळे मळमळ आणि उलट्या येणे अश्या समस्या या निर्माण होतात.