रात्री कामानिमित्त जागत असाल तर, हे पदार्थ खा आणि मिळवा ऊर्जा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल आपण जगत असलेले युग इतके वेगात बदलत आहे कि बस्स. माणसाचे जीवन दिवसेंदिवस इतके आधुनिक आणि प्रगत होत आहे कि अनेको गोष्टी एक क्षणात इतिहासजमा होत आहेत. या वेगामुळे आपल्याला आपल्याच आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. परिणामी माणसाचे आयुष्यमान घाटात चालल्याचे दिसून येत आहे. सगळेच या आधुनिकतेच्या स्पर्धेत इतके व्यस्त आहेत कि खाणे, पिणे, झोपणे याची कुणालाच शुद्ध नाही. दिवस असो नाहीतर रात्र काम करा आणि धन मिळवा अश्या ब्रीदाचे जीवन आपण जगात आहोत. यात अनेक कामे अशी असतात जी रात्रीच्या शांततेत केली जातात. उदाहरण द्यायचे झंझालेंच तर, व्हिडीओ एडिटिंग, अल्बम सेटिंग, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन, कॉल सेंटर, नेशन अँबेसि.
या सर्व कामकाजाच्या वेळा रात्रीचे जागरण करण्यास भाग पाडतात. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. कारण रात्री न झोपल्यामुळे सकाळी झोप लागते आणि अख्खी दैनंदिन दिनचर्या बदलून जाते. पण आता अनेकांच्या जीवनशैलीचा हा एक भाग झाला आहे. पण याहीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी पर्याय आहेत. जसे कि, जेवणाच्या वेळा चुकल्यास रात्री काम करत असताना अधेमध्ये भूक लागते. अश्यावेळी योग्य पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. रात्री ब्रेड, इन्संट पिझ्झा, पास्ता, न्यूडल्स, माव्याची बिस्किटे, केक किंवा मग फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पदार्थ खाणे आरोग्याचे नुकसान करतात. कारण एकतर हे पदार्थ पचायला जड आणि त्यातही ते पौष्टिक नसतात. यामुळे पित्त, अपचन, पोट दुखणे, गॅस होणे अशा समस्या जाणवतात. यासाठीच रात्री भूक लागलीच तर काय खायचे हे माहित असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात:-
१) सफरचंद – फळं खाणं असाही आरोग्यासाठी लाभदायक असतेच. पण रात्रीची भूक भागवण्यासाठी याहून उत्तम पर्यायच नाही. मात्र रात्री केळं, चिकू, अननस अशी गोड फळं खाण्यापेक्षा केवळ एक सफरचंद खा. यामुळे शरीराला पुरेसे पोषण आणि ऊर्जा दोन्ही मिळेल. शिवाय पोट भरेल, भूक मिटेल आणि शांत झोपसुद्धा लागेल.
२) लो फॅट दूध – रात्री भुक लागलीच तर एक ग्लास दूध पिणं कधीही चांगलं. पण जर तुम्ही रात्री खूपच उशीरा दूध पिणार असाल तर त्यासाठी लो फॅट दूध प्या. कारण यामध्ये फॅट्स कमी असतात आणि त्यात असणाऱ्या ट्रिप्टोफेनमुळे शरीराला अमिनो अॅसिड मिळतं. शिवाय हे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करतात आणि शांत झोप लागण्यासाठी मदत करतात. हे दूध पचायला जाड नसते आणि यातून शरीराला भरपूर प्रोटिन्ससुद्धा मिळतात. त्यामुळे रात्रीच्या भूकेवर लो फॅट दूध उत्तम पर्याय आहे.
३) मूठभर सुका मेवा – रात्री जड पदार्थ खाणे खाण्यापेक्षा मूठभर ड्रायफ्रूट वा सुकामेवा खा. रात्रीची भूक भागवण्यासाठी दहा बारा बदाम, थोडे शेंगदाणे, काजू, अक्रोड आणि पिस्ता मिक्स करून खाल्ल्याने शरीराला चांगले फॅट्स, प्रोटिन्स, फायबर्स मिळतात. ज्यामुळे सतत व लगेच भूक लागत नाही.
४) पॉपकॉर्न – रात्री जगल्यामुळे भूक लागत असेल पॉपकॉर्न खा. कारण पॉपकॉर्न हलके असतात. शिवाय यात भरपूर कॅलरिज आणि फायबर असतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री बटरचा वापर न करता रोस्ट केलेले पॉपकॉर्न खा. ज्यामुळे पोटही भरेल आणि त्रासही होणार नाही. शिवाय शांत झोप लागेल.
५) मखाना – मखाना रात्री यावेळी लागलेली भूक मिटवण्यासाठी अतिशय योग्य पर्याय मानला जातो. कारण पचायला हलका आणि शारीरिक ऊर्जा संतुलित करण्यासाठी मखाना मदत करतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करताय आणि भूक लागली तर पॉपकॉर्नसारखाच मखानासुद्धा खाणे लाभदायक आहे हे विसरू नका.