| |

अनिद्रेच्या विकारावर कसे मिळवालं नियंत्रण ? जाणून घ्या उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन| आजकाल बदलती जीवनशैली अनेको आजारांचे मूळ कारण झाल्याचे दिसून येत आहे. कुणाला मानसिक आरोग्यविषयक समस्या तर कुणाला शारीरिक आरोग्याशी संबंधित समस्या. इतकेच काय तर सौंदर्या संबंधितही अनेकांना अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांचा कुठे ना कुठे निद्रा अर्थात झोपेशी संबंध आहे. आपल्या शरीराला आणि मेंदूला आवश्यक तितका आराम न मिळाल्याने अनेको गंभीर समस्या उपस्थित होत असतात.

आपण झोपी जातो तेव्हा शरीर शवावस्थेत असते. त्याची कोणतीही हालचाल नसल्यामुळे शरीराचा थकवा निघून जातो. मात्र अनेकदा डोक्यात घोळत असलेले विचार आपल्याला झोपू देत नाहीत. म्हणजे, दिसताना आपण झोपले असल्याचेच दिसते मात्र मेंदू आपले कार्य करीत असतो. शिवाय ऑफिसमध्ये अधिक कामाचा ताण असेल तरीही झोपेची समस्या उद्भवते. त्यामुळे अनिद्रा हादेखील गंभीर त्रासंपैकी एक त्रास आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे गजेचेचे आहे. चला तर अनिद्रा चा त्रास असेल तर कोणते उपाय करावे हे जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) मानसिक ताण तणावापासून दूर रहा.
– मानसिक ताण-तणाव, डिप्रेशन कमी केल्यास अनिद्रेपासून सुटका मिळते. यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान करणे, हलका-फुलका व्यायाम करणे फायदेशीर मानले जाते.

२) व्यसनांची साथ सोडा.
– व्यसनापासून दूर राहिल्याने अनिद्रेची समस्या उद्भवत नाही. यासाठी सकारात्मक विचार व सकारात्मक जीवन जगण्याचा यशस्वी प्रयत्न करावा.

३) जेवणाच्या वेळा वारंवार बदलू नये.
– नियमित ठरल्या वेळेत जेवण घेणे आणि पचायला हलका असणारा आहार घेऊन चयापचय बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

४) नियमित सकाळी व्यायाम करावा.
– नियमित व्यायाम केल्याने शरीर हलके व स्वस्थ राहते. मात्र झोपण्यापूर्वी व्यायाम करू नये. यासाठी दररोज सकाळी योगासने, प्राणायाम केल्यास लाभ होतो.

५) झोपण्या- उठण्याची वेळ सुनिश्चित करा.
– झोपण्याची वेळ व पहाटे उठण्याची वेळ सुनिश्‍चित करावी आणि अधिक थकवा असतानाही वेळेत बदल न करता दिनचर्या सुरू ठेवावी.

६) झोपतेवेळी शरीर मोकळे सोडावे.
– झोपताना संपूर्ण शरीर ढिले अर्थात मोकळे सोडावे आणि दीर्घश्‍वसनाचा अभ्यास करावा.

७) कोमट पाण्याने अंघोळ करा.
– दररोज सायंकाळी कोमट पाण्याने अंघोळ करावी, यामुळे शरीर तणावमुक्त होते आणि चांगली झोप येते.

८) झोपण्याआधी गरम दूध प्यावे.
– रात्री झोपण्याआधी अर्धा ग्लास गरम दूध प्यावे. या दुधात जायफळ पावडर किंवा हळदीचा वापर केल्यास चांगली झोप येते. मात्र स्थूल व्यक्तीने दुधाचा प्रयोग करू नये.