If you suffer from nasal congestion in winter ....
|

हिवाळ्यात नाक बंद झालेल्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर….

हॅलो आरोग्य ऑनलाईन । हिवाळ्याच्या दिवसांत सगळीकडे थंडीचे वातावरण असते. त्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजचे आहे. कारण थंडीच्या दिवसात सर्दी , खोकला , ताप अश्या समस्या या खूप जास्त प्रमाणात जाणवतात. आजूबाजूला थंडी असल्याने अनेक वेळा सर्दी आणि ताप यासारख्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. त्यामुळे थंडीच्या काळात थंड पदार्थ अजिबात खाऊ नका. बंद झालेल्या नाकावर घरगुती पद्धतीने काय उपाय करू शकतो ? ते जाणून घेऊया …

गरम पदार्थांचे सेवन –

अनेक वेळा नाक बंद असल्यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास हा होऊ शकतो. त्यावेळी शक्यतो गरम पदार्थांचा आहारात समावेश करावा. जेव्हा आपण गरम वस्तू खाता तेव्हा या गरम वस्तू आपल्या घशाला आणि नाकाला आराम मिळवून देतात. या साठी आपण गरम पाणी किंवा गरम वरणाचे सेवन करू शकता. किंवा चहा कॉफी पित असाल तर ते देखील पिऊ शकता. असं केल्यानं बंद नाक त्वरितच उघडते.

मोहरीच्या तेलाची मॉलिश —

बंद नाक उघडण्यासाठी मोहरीच्या तेलाची मॉलिश देखील करू शकता. हे तेल नाकासाठी खूप प्रभावी असते. मोहरीच्या तेलात लसणाची एक पाकळी आणि थोडंसं ओवा घालून गरम करावं. हे तेल थंड झाल्यावर हळुवार हाताने मॉलिश करायची आहे. हे तेल नाकाच्या वर लावल्यानं बंद नाक उघडेल. लसणाची प्रकृती उष्ण असते. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या सुद्धा आरोग्यास महत्वाचे आहेत.

गरम पाण्याची वाफ—

बंद नाक उघडण्यासाठी आपण गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. या साठी पाणी गरम करा. त्यामध्ये ओवा घाला आणि त्याची वाफ घ्या. आपल्या दररोज च्या वापरात जरी गरम पाण्याची वाफ असेल तरीही ते आरोग्यास फायदेशीर आहे. डोकेदुखी, मळमळणे सारख्या त्रासांमध्ये देखील आराम मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *