|

प्रवासात होतो मळमळ आणि उलट्यांचा त्रास, तर मग हे उपाय करा हमखास; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना प्रवासात चक्कर येणे, पोटात ढवळणे, मळमळणे आणि उल्टी होणे अश्या अनेक तक्रारी जाणवतात. त्यामुळे असे लोक अनेकदा विविध औषध गोळ्यांचा वापर करतात. मात्र हा कोणताही आजार नसून हि केवळ एक समस्या आहे जी मेंदूला अवयवांकडून मिळणाऱ्या विविध संकेतांमुळे उत्पन्न होते. म्हणूनच प्रवासादरम्यान उलटी होत असेल तर कोणते उपाय करावे हे जाणून घ्या.

  • खालीलप्रमाणे :-

१) चॉकलेट – चॉकलेट खाल्ल्याने मन चांगले होते. यामुळे मळमळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

२) सुगंधित वस्तू – मळमळ किंवा उलटी जाणवत असेल तर सुवासिक सुगंधित वस्तूंचा वास घ्यावा यामुळे मन चांगले होते. म्हणून प्रवासात आपल्या सोबत सुगंधित वस्तू जरूर ठेवाव्या.

३) पुदीना – पुदिना तीव्र वासाशी संबंध ठेवतो. यामुळे प्रवास करताना चक्कर करणे, उलटी होणे किंवा मळमळ होणे असे त्रास होत असेल तर प्रवासात पुदीन्याचे सिरप सोबत ठेवा आणि प्रवास करण्यापूर्वी प्या किंवा पुदीनाच्या गोळ्यांचे पाकीट सोबत ठेवा.

४) लिंबू पाणी – प्रवास करताना मळमळ किंवा उलट्या यांपैकी कोणतेही त्रास जाणवल्यास लिंबाचा रस पाण्यात पिळून त्यामध्ये मीठ घालून सेवन केल्याने मळमळ व पोटातील ढवळणे थांबते.

५) आलं आणि लवंगाचा चहा – प्रवास करताना मन खराब होत असेल तर तुम्ही आलं आणि लवंगाचा चहा प्या. या चहाने मन ठीक होते आणि उलटीपासून आराम मिळतो.

  • लक्षात ठेवा :-
    – खिडकीच्या बाजूला बसा. यामुळे नैसर्गिक हवेशी आपला संबंध येतो ज्याने मन खराब होत नाही आणि उलट्यांचा त्रास देखील होत नाही.
    – प्रवास करतेवेळी अनेकांना मोबाईल गेम खेळणे टाळा. यामुळे प्रवासादरम्यान चक्कर येऊ लागते आणि मन खराब होते. या
    – प्रवास करताना हलके अन्न खा. मसालेदार पदार्थ टाळा.