केसांसाठी घरगुती हेअर ऑईल वापराल, तर हेअर स्पा विसरून जाल; जाणून घ्या फायदे

0
174
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केसांची काळजी घेण्यासाठी न जाणे आपण कित्येक शॅम्पू वापरतो, कधी सिरम, वेगवेगळी ऑइल प्रोडक्टस आणि याहीपेक्षा अधिक सांगायचे म्हणजे सतत ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कधी हेअर स्पा, कधी हेअर क्लिनिंग, वॉशिंग आणि अजून बरंच काही. आपले केस सुंदर दिसावे म्हणून काय काय करतो ना आपण! पण मैत्रिणींनो हे एवढं सगळं कशाला करताय. अर्थात तुमचे केस सुंदर आणि चमकदार दिसावे म्हणून हि धडपड करता हे जाणतो आम्ही पण तरीही कश्यासाठी?

कश्यासाठी हे विचारण्यामागे एक कारण आहे. हे कारण म्हणजे जेव्हा घरातच तुम्ही केसांची योग्य निगा राखण्यासाठी लाभदायक पर्यायांचा अवलंब करू शकता तेव्हा एवढी खटाटोप कशाला? होय. तुम्ही कधी घरगुती हेअर ऑइल वापरले आहेत? जर नाही तर एकदा वापरून बघाच. अगदी एक ते दोन साहित्य वापरुन बनवलेले हे तेल बनवणं जितके सोपे तितकेच केसांसाठी फायदेही आहेत. त्यामुळे तुम्ही आवर्जुन ही तेलं घरात बनवा आणि वापरून पहा. चला तर जाणून घेऊयात तेलाचे प्रकार, बनविण्याची कृती आणि फायदे –

१) जास्वंदाचे तेल
– जास्वंद केसांसाठी फारच फायदेशीर असते. कारण केसांसाठी जास्वंदाचे तेल वापरल्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. आता हे तेल कसे बनवायचे असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका हे अगदीच सोप्पे आहे.

० कसे बनवालं?
– यासाठी जास्वंदाची फुले काही दिवस चांगली वाळवून घ्या. ती चांगली वाळली की, ती सुकवून त्याची पूड करुन घ्या. ही पूड तुमच्या आवडीच्या कोणत्याही तेलात उकळून घ्या आणि हे तेल थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये भरून ठेवा. हे तेल तुम्ही केसांसाठी कधीही वापरू शकता. पण केस धुण्याआधी रात्रभर हे तेल लावून ठेवलं तर अधिक लाभ मिळेल.

० फायदा – जास्वंदाच्या तेलामुळेही केसांच्या वाढीला चालना मिळते. केसांची वाढ जोमाने होते. केसातील कोंडा कमी होते. ड्राय स्काल्पचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो.

२) कडुनिंबाचे तेल
– कडुनिबांचे तेल केसांच्या वाढीसाठी अत्यंत लाभदायक मानले. त्यामुळे कडुनिंबाचे तेल केसांना पोषण देण्यास सक्षम आहे. यासाठी कडुनिंबाची पाने आणि देठ दोन्ही वापरले तरीही चालेल.

० कसे बनवालं?
– यासाठी कडुनिंबाचा पाला देठासकट चांगला २-३ उनं दाखवून सुकवून घ्या. यानंतर कडुनिंब वाटून त्याची बारीक पूड करुन घ्या. आता खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये कडुनिंबाची पावडर घाला. हे तेल चांगले उकळून घ्या. तेल थंड झाल्यानंतर आठवड्यातून फक्त १-२ वेळा लावा आणि सौम्य शॅम्पूने केस धुवून घ्या.

० फायदा – केसातील कोंडा काढून टाकण्यासाठी आणि केसांना काळेभोर ठेवण्यासाठी हे तेल उत्तम पद्धतीने काम करते.

३) कडिपत्त्याचे तेल – बाजारात कडीपत्ता फार सहज उपलब्ध असतो. शिवाय जर तुमच्या दारातच कडीपत्ता असेल तर क्या बात है! कडिपत्त्याचा उपयोग करुन कडिपत्त्याचे तेल घरच्या घरी बनवून केसांचे पोषण सहज मिळवता येते.

० कसे बनवालं?
– यासाठी भरपूर कडिपत्त्याची पाने लागतील. ही पाने घेऊन खोबरेल तेलामध्ये चांगली उकळून घ्या. त्यामुळे कडिपत्त्याचा अर्क पूर्णपणे तेलात उतरतो. यानंतर हे तेल थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून किमान एकदा केसांना लावा.

० फायदा – कडीपत्त्याची तेल केसांचा काळा रंग टिकवण्यास मदत करते. तर केसांमधील कोंडा काढून टाकण्यासही मदत करते. शिवाय केस वाढीस चालना मिळते. शिवाय केस अधिक चमकदार आणि चांगले दिसतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here