| |

नासलेल्या दुधाचा असा वापर कराल, तर अन्नाची पौष्टिकता होईल दुप्पट; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि घाईगडबडीत किंवा वेळ न मिळाल्यामुळे दूध गरम करायला आपण विसरू किंवा फ्रिजमध्ये ठेवायला विसरतो आणि मग दूध खराब होत. मुख्य म्हणजे नेमका चहा प्यायचा मूड असेल आणि दूध खराब झालं तर नाहक चिडचिड होते. मग काय हे दूध फेकून दिल जातं आणि इतर पर्यायाचा शोध घेतला जातो. पण मग अशी चिडचिड टाळण्यासाठी दूध फेकून देऊ नका असे आम्ही सांगू. कारण नसलेल्या दुधाचा असा काही वापर करता येतो ज्यामुळे अन्नाची चव दुप्पटीने वाढते आणि मूडचं म्हणाल तर तुम्हीही खुश आणि बच्चे कंपनी सुद्धा खुश होईल.. फक्त यासाठी काय करायचे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

० बहुतेक स्त्रिया नासलेल्या दुधापासून पनीर बनवतात आणि उरलेले पाणी फेकून देतात. पण तुम्हला माहीत आहे का? या नासलेल्या दुधाचे पाणी पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असते. यामुळे नासलेल्या दुधाचा वापर करून आपण केवळ जिभेची चव नव्हे तर आरोग्यदेखील वाढवू शकतो.

१) भाजीची ग्रेव्ही – अनेकांना घट्ट रश्श्याची भाजी खायला खूप आवडते. मग अशी भाजी बनवताना तुम्ही नसलेले दूध वापरू शकता. होय. भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी नासलेले दूध कमी येते. यासाठी तुम्हाला शिजवलेल्या भाजीमध्ये शेवटच्या क्षणी नासलेले दूध टाकून त्याला शिजवायचे आहे. यामुळे भाजीची ग्रेव्ही घट्ट, चविष्ट आणि अगदी पौष्टिकदेखील होईल.

२) पोळ्यांचे कणिक मळा – नासलेल्या दुधाचा वापर करून रोजच्या आहारातील पोळ्यांचे कणिक मळून घेता येईल. यामुळे कणकेला वेगळे असे तेल लावायची गरज नाही. शिवाय या कणकेपासून बनणाऱ्या पोळ्या खूपच मऊ राहतील.

३) खवा बनवा – रात्री ठेवलेले दूध सकाळी गरम झाल्यावर नासले तर ते फेकून देऊ नका त्यापासून चविष्ट खवा बनवा. हा खवा बनवण्यासाठी, नासलेले दूध एका भांड्यात गरम करून घ्या आणि जोपर्यंत त्याचे पाणी आटत नाही तोपर्यंत ते तापवा. एकदा का पूर्णपणे पाणी आतले कि मग त्यात वरून साखर घाला आणि थोडा वेळ शिजवा. अहो झाला ना आपला खवा तयार.

४) बर्फी बनवा – नासलेल्या दुधापासून खवा तयार करा आणि याच खव्यापासून मस्त बर्फी बनवा. तुमच्या आवडीप्रमाणे यात ड्रायफ्रूट्स, इसेन्स टाकून बर्फीच्या आकारात हे कापून घ्या. त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. पुढं अर्ध्या तासानंतर टेस्टी बर्फी तयार होईल.