| | |

हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर नाश्ता हवा हेल्दी- टेस्टी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. आपण सारेच जाणतो कि हिवाळ्यात वजन कमी करणे म्हणजे अतिशय कठीण काम. पण वेळीच लक्ष न दिल्यास हा हंगाम त्रासदायी ठरू शकतो. कारण थंडीमध्ये एकतर भूक जास्त लागते आणि तहान कमी लागते. परिणामी आपण नको तेव्हा नको ते खातो आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर. जसे कि, झपाट्याने वजन वाढणे. त्यामुळे योग्य आहार आणि योग्य जीवनशैली हि कोणत्याही हंगामात अत्यंत महत्वाची आहे.

मित्रांनो हिवाळ्यात वजन कमी करणे कठीण असले तरीही अशक्य नाही. कारण आज आम्ही तुम्हाला असे काही नाश्त्याचे पर्याय सुचवणार आहोत. जे टेस्टीसुद्धा आहेत आणि हेल्दीसुद्धा. चला तर जाणून घेऊयात असे कोणते नाश्त्याचे प्रकार आहेत जे हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी सहाय्यक ठरतात ते खालीलप्रमाणे:-

१) लिंबू आणि मध – पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी १ ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून यात १ चमचा मध मिसळून प्या. यामुळे वजन नियंत्रणात राहील शिवाय पोटावर चरबी जमा होणार नाही. मात्र ज्या लोकांना सर्दीचा त्रास असेल त्यांनी लिंबू वगळावे.

२) एक वाटी दही – दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. यासोबतच शरीरातील प्रथिनांचे प्रमाणही नियंत्रित ठेवते आणि पाण्याचे प्रमाणदेखील संतुलित करते. म्हणून दह्याचा नाश्त्यात समावेश करा. सर्दी, खोकला सायनस असणाऱ्या लोकांनी दही खाणे टाळावे.

३) उपमा – रव्यापासून बनवलेला उपमा वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. कारण रवा बॅड कोलेस्ट्रॉल घटवून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतो. मात्र, उपमा नेहमी कमी तेलात वा चमचाभर तुपात बनवा.

४) दूध आणि तूप – एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा तूप मिसळून प्यायल्यास शरीर आतून मजबूत होते. शिवाय पोट बराच काळ भरलेले असल्यामुळे वारंवार भूक लागत नाही. यामुळे अतिरिक्त खाणे टाळल्याने वजनावर नियंत्रण मिळवता येते.

५) मूग डाळीचा डोसा – फायबरयुक्त मूग डाळीच्या डोश्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. शिवाय डाळीतील फायबर हे पॉट बराच काळ भरलेले राहण्यासाठी सहाय्यक आहे. परिणामी अतिरिक्त खाणे टाळता येते आणि यातील फायबर पोटाची चरबी कमी करते.