If your children are sleeping ...

तुमची मुले झोपेत चालत असतील तर …

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपण ऐकले असेल किंवा पहिले पण असेल कि , आपल्याच घरातले किंवा आजूबाजूचा एखादा मुलगा हा झोपेत असताना तो चालत चालत बाहेर जातो .अचानक जाग आल्याने त्या मुलाला होणारा धोका हा टळला जातो. अश्या प्रकारच्या काही गोष्टी ऐकण्यात आल्या असतील . पण असे खरंच तुमच्या मुलांच्या बाबतीत होत असेल तर मात्र तुम्ही काळजी हि जास्त प्रमाणात घेतली गेली पाहिजे .

मध्यरात्रीची वेळ आहे. अश्या वेळी तुम्ही अगदी गाढ झोपेत आहात आणि अचानक जाग येताच तुमचे मूल अगदी गोंधळलेल्या अवस्थेत झोपेत चालत असलेले पाहिले असेल तर मात्र तुमच्या मनाची अवस्था काय होत असेल यांची आपण कल्पना फक्त करू शकतो. याचा अर्थ म्हणजे तुमच्या मुलाला रात्रीच्या वेळी काहींना काही झोपेच्या समस्या असू शकतात.

 

काय आहेत झोपेत चालण्यामागची कारणे:

— थकवा

— मुलांमध्ये असलेल्या अपुऱ्या झोपेचे प्रमाण

— — -झोपेच्या सवयीत अनियमितता असणे .

— खूप जास्त प्रमाणात तणाव असणे .

— झोपेच्या काळात वातावरण हे अजिबात ठीक नसणे .

— झोपेचे नेहमीचे वातावरण बदलणे

—- आजार किंवा ताप असेल तर सुद्धा मुले रात्रीच्या वेळेत चालायला लागतात.