eyebrows
| |

खूपच पातळ आहेत तुमच्या भुवया? तर अशा करा दाट

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल मुली आपल्या सौदर्यासाठी खूपच काळजीवाहू असतात. सौदर्य हे अजून खुलून ठेवण्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरतात. पण जर तुमच्या भुवयांमधील केस हे फारच विरळ असतील ,तर तुमचे सौदर्य इतके खास वाटत नाही. त्यावेळी मात्र अनेक मुली पेन्सिल चा वापर करतात. पण जर नैसर्गिक रित्या जर तुमच्या भुवयांचे केस दाट आणि सुदंर असतील तर मात्र लुक एकदम परफेक्ट दिसतो. पण त्यापूर्वी तुमचे भुवयांचे केस दाट कसे करता येतील ते पाहूया ….

आपल्या आजूबाजूला आयुर्वेदीक वनस्पतींचे खूप मोठे भांडार आहे. त्यातील काही वनस्पतींचा वापर हा आपल्या भुवयांसाठी केला जाऊ शकतो. तुमच्या बागेत असलेली कोरफड हि त्यावर जालीम उपाय म्हणून वापरू शकता. कोरफडीचा गर काढून ती  भुवयांवर लावा. त्याचे जेल सुद्धा बाजारात अनेक ठिकाणी सहज मिळते. ते  केस वाढवण्यास आणि दाट करण्यास मदत करते.

अनेकांच्या घरी दररोज दूध येते. पण आपल्याकडे येणारे दूध हे निरसे नसते. ज्या दुधामध्ये प्रोटिन्स ची मात्रा जास्त असेल ते दूध तुम्ही आपल्या भुवयांना लावा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे निरसे दूध लाभकारक राहील. ते दूध लावल्याने जे इतर केस आहेत, ते गळायला मदत होते. आणि नवीन दाट  केस यायला सुरुवात होते.

केसांच्या वाढीसाठी ऑलिव्ह ऑइल हे महत्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे ते भुवयांच्या केसांच्या वाढीला सुद्धा मदत करते. दररोज सकाळ आणि संध्याकाळ कापसाच्या साह्याने भुवयांना लावा. लवकरच तुम्हाला तेथील केस वाढलेले दिसतील.

बाजारात उपलब्ध असलेली पेट्रोलियम जेली हि दिवसभरात ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी भुवयांवर लावा. लवकर केस दाट दिसतील.