| |

थंडीत त्वचा फुटल्यास ‘या’ टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीच्या हंगामात सगळ्यात महत्वाची आणि सामान्य समस्या म्हणजे त्वचा फुटणे. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीचा हंगाम असा असतो कि दरम्यानचे वातावरण आपल्या त्वचेतील आद्रता शोषून घेते. परिणामी आपली त्वचा कोरडी होऊ लागते आणि मग त्वचेवरील हलके पापुद्रे निघू लागतात. दिसताना सामान्य वाटणारी हि समस्या कधी कधी गंभीर होऊ शकते. जसे कि त्वचा फाटल्यामुळे जखमा होणे. म्हणूनच अशा मोसमात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे नक्कीच गरजेचे आहे. पण काळजी घ्यायची म्हणजे काय? आणि नेमकी कशी घ्यायची काळजी? चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

० सर्वात आधी आपण जाणून घेऊ कि चेहऱ्यावरील कोणत्या भागावरून त्वचेचे पापुद्रे निघतात ते खालीलप्रमाणे:-

– नाकाजवळची त्वचा

– ओठांजवळची त्वचा

– गालांवरील त्वचा

– केसांमध्ये डोक्यावरील (स्कॅल्प) त्वचा

० चला तर जाणून घेऊ पापुद्रे निघणाऱ्या त्वचेसाठी काही टिप्स

केमिकल फ्री सौंदर्य प्रसाधने – जर तुम्हाला स्वस्त केमिकल्सयुक्त सौंदर्य उत्पादनांचा वापर करायची सवय असेल तर थंडीच्या हंगामात हीच गोष्ट तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण असे प्रोडक्ट्स तुमच्या समस्या वाढवू शकतात. म्हणून थंडीमध्ये सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री माईल्ड प्रॉडक्टसचा वापर करा.

बदाम तेल आणि व्हिटामिन ई – थंडीच्या दिवसांत आपल्या त्वचेसाठी बदाम तेल आणि व्हिटामिन ई उपयुक्त ठरतात. याने मसाज केल्याने त्वचा सुधारण्यास मदत होते. शिवाय त्वचेतील मांसल पेशी पुन्हा सक्रिय होतात. म्हणून बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई च्या केपसूलचे मिश्रण ५ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचेचे संरक्षण होईल.

एक्सफोलिएशन – कोरडी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी चेहरा एक्सफोलिएट करा. एक्सफोलिएशन भले घरात बनवलेल्या स्क्रबने कराल पण कराच. यासाठी कोणताही माईल्ड स्क्रब वापरा. मात्र हे खूप सौम्यतेने करा. सर्वसाधारणपणे ड्राय स्किनसाठी आठवड्यातून २ वेळा एक्सफोलिएशन पुरेसे आहे.

मॉश्चराईजेशन – कोणत्याही हंगामात त्वचेला मॉश्चरायझ करायला विसरू नका. कारण हि क्रिया आपल्या त्वचेला कोरडेपणापासून दूर ठेवते. यासाठी वेळोवेळी चेहरा मॉश्चराईज करा. यासाठी सनस्क्रीन लोशन आणि मॉश्चरायझर क्रीम तुम्हाला मदत करतील.