flower

आयुर्वेदात समावेश असलेल्या सुगंधित फुलाचे महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आयुर्वेदात अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींसाठी घरगुती उपाय सांगितले गेले आहेत. आयुर्वेद हे खूप पुरातन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. आयुर्वेदातील वस्तूंचा वापर आपल्या दिनक्रमात केला तर मात्र त्याचे फायदेच आपल्या शरीराला होतात. आयुर्वेदात सांगितल्या गेलेल्या फुलांबाबत सुद्धा आपण माहिती घेऊया …

—आपल्या घराच्या आजूबाजूला लावलेली फुले हिआपल्या घराला सुगंधित करतात.

— आजूबाजूचे वातावरण हे खूप सुदंर राहण्यास मदत होते.

—फुलाच्या सुवासाने नवीन काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि ऊर्जाही मिळते.फुलांबाबत माहिती घेऊया …

जाई —

जाईचे फूल अतिशय सुगंधी, दिसायला मनोहर व कफ- पित्तशामक असते. जाईच्या कळ्या नेत्ररोग, त्वचारोग, जखमा, फोड येणे वैगेरे तक्रांरिवर उपयुक्त असतात..

जुई—

जुईचे फूल सुगंधि असून पित्तदोष कमि करते. दाह शमवते. तहान भागवण्याचे काम करते. मूतखडा, शिरोरोग, त्वचाविकार, रक्तदोष, जखमा, दंतरोग, नेत्ररोग, मुखरोग, अश्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

सोनचाफा—- 
सोनचाफा चविला गोड, तिखट, कडू व तुरट असतो. पण त्याचे गुण हे प्रभावी आहेत. हा सोनचाफा हा विषदोषाचे शमन करतो. रक्तदोष दूर करतो. सोनचाफ्याच्या सुगंधामुळे हवा शुद्ध होते.आजूबाजूला सोनचाफा असणे आवश्यक आहे.

बकुळ —

बकुळिचि फूले वीर्याने थंड व गोड सुगंधाचि असतात. रूचि वाढवतात. चविला मधुर व तुरट असून गुणाने स्निग्ध असतात. लहान बालकाला खोकला झाला असता बकुळिचि फूले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळि गाळुन घेउन ते पाणि पिण्यास देतात. बकुळिचि ताजि फुले खडिसाखरेसह खाल्यास व वरून थंड पाणी पिल्यास हलणारे दात मजबुत होतात. असे म्हंटले गेले आहे .