Importance of Rajgira

राजगिरा या धान्याचे महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. उपवासाच्या दिवशी तर आपल्या आहारात अनेक वेगवगेळ्या फळाचा आणि पदार्थांचा समावेश करतो. पदार्थ हे खाण्यात असतील तर त्यामुळे आपल्याला योग्य प्रमाणात पोटॅशियम , कॅल्शियम असे घटक मिळायला मदत होते. राजगिरा या धान्याचे पीक जास्त करून घेतले जाते नाही . पण याचे शरीरासाठी महत्व खूप आहे.

 

राजगिरा या धान्यापासूनआपल्या आहारात असलेले लाडू बनले जातात. हे लाडू तर खूप आरोग्यवर्धक असतात. त्याचा वापर हा जास्त करून उपवासाच्या दिवशीच केला जातो. उपवासादिवशी पोटात कमी अन्न जाते त्यामुळे बऱ्याच वेळा थकवा येतो. त्यावेळी त्याचा वापर हा केला जातो. राजगिऱ्यात गव्हापेक्षा कैक पटीने जास्त लोह , कॅल्शियम, व्हिटॅमिन सी असते. त्यामध्ये गुळाचे प्रमाण हे जास्त असल्याने ते आरोग्यवर्धक सुद्धा असते.

 

राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कर्बोदके आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी/बालकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या.राजगिऱ्या च्या नियमित सेवनाने मधुमेह व बीपी आपण लांब ठेवू शकतो.