| | |

केसतोड झाल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, नक्कीच असह्य वेदनेपासून आराम मिळेल

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपण कधी केसतोड चा अनुभव घेतला आहे का? जर घेतला असेल तरच याचे दुखणे काय असते ते आपण जाणू शकता. परंतु केसतोड होण्याचे कारण काय आहे. आणि त्यावर नेमके काय घरगुती उपाय करावेत हे आज आपण माहीत करून घेणार आहोत.

केसतोड म्हणजे काय? – शरीराच्या कोणत्याही भागावरील केस मुळापासून तुटला का त्याठिकाणी केसतोड होते. त्याचे दुखणे फार असह्य असे असते. जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागाचे केस मुळांपासून तुटतात , तेव्हा तेथे प्रथम एक मुरूमासारखी छोटी फुटकुळी येते त्यानंतर त्याठिकाणी जखम मुळ धरू लागते. नंतर हळूहळू त्याचे  मोठ्या जखमेत रूपांतर होते, ज्याला Boil किंवा केसतोड म्हणतात. त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्‍या वेदनाकारी गळूला केसतोड, बेंड किंवा करट म्हणतात.  स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतोड  होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे मूळ, मुळाशी संबंधित ग्रंथी आणि इतर ऊती यांचा स्थानिक क्षोभ होतो. शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो किंवा ज्या भागावर अधिक घर्षण होते तेथील त्वचेवर केसतूड होण्याचा संभव अधिक असतो. म्हणूनच काख, जांघ, पाठ, मान, कुल्ले, गुदद्वाराभोवतीची जागा, बाह्यकर्णनलिका, नाक, डोळ्यांची पापणी या भागांतील केसांमध्ये केसतूड होते.

केसतोड ज्या भागात होते त्या केसाच्या मुळाशी सुरुवातीला एक लालसर कठिण फोड दिसू लागतो. हा फोड वाढत जाऊन तेथे वेदना होतात. काही वेळा तापही येतो. क्वचित प्रसंगी या अवस्थेत पू न होता केसतूड जिरून जाते. परंतु असे न झाल्यास सूज वाढते आणि वेदनाही वाढतात. फोडाच्या मध्यभागी केस असून त्याच्याभोवती पांढरट ठिपका दिसतो. या भागातील पांढर्‍या पेशी आणि रक्तद्रव एकत्र साचून पू तयार होतो. हळूहळू त्याभोवती काळसर लाल घट्ट भाग दिसू लागतो. या स्थितीत तेथील लसिका ग्रंथी दुखू लागतात. हे केसतूड फुटले की, केस व त्याच्या मुळाभोवती तयार झालेला पू बाहेर पडतो. लगेच वेदना थांबतात आणि जखम सावकाश भरून येते.

केसतोडवर घरगुती उपाय

लसूण

आयुर्वेदामध्ये लसूण हा औषधी मानला जातो. आपल्या नियमित आहारात लसणाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. तसेच केसतोडवर लसूण एक रामबाण उपाय आहे. लसूण हा वेदना शमन म्हणून कार्य करतो. केसतोड आल्यास लसूण ठेचून त्याचा लेप बाजूने लावल्यास केसतोड कमी होते, वेदनेपासून मुक्ती मिळते आणि दोन ते तीन दिवसात बरी होते.

कांदा

कांदा हा बहुगुणी आहे. कांदा हा केसतोडावर एक रामबाण उपाय आहे. यासठी कांदा चांगला ठेचून त्याची पेस्ट करुन तो केसतोडच्या बाजूने लावाला आणि कपड्याने तो बांधून घ्यावा. कमीत कमी २ तास हा कांदा कपड्याने बांधून केसतोडाच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे आराम मिळतो.

हळद

केसतोडीचे दुखणे असह्य होते अशावेळी हळद ही महत्वाची ठरते. हळद ही बहु गुणकारी आहे. हळदीतील आयुर्वेदिक आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे केसतोड समस्या लवकर बरी होण्यास मदत होते.

मेहंदी

केसतोड आल्यास प्रचंड आग आग होते. अशावेळी मेहंदीचा वापर करावा. मेहंदी थंड असल्याने ती पाण्यात भिजवून केसतोडच्या बाजूला लावाली. यामुळे जखमेजवळ थंडावा मिळून त्रास कमी होतो.

कडूनिंब

कडूनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे. ज्यामुळे तुम्हाला होणाऱ्या वेगवेगळ्या अॅलर्जी पासून बचाव होतो. कडूनिंब आपल्या शरीरावरील केसतोड मुळातून आणि कुठल्याही प्रादुर्भावाशिवाय काढून टाकतो. यासाठी मुठभर कडूनिंबाच्या पानाचा लेप केसतोडवर लावावा. तसेच रोजच्या दैनंदिनी मध्ये सकाळी जर दोन पाने कडूनिंबाची खाल्ली तर यामुळे निश्चित फायदा होतो.

एवढे उपाय करून जरी फरक पडत नसेल किंवा वर्षातून जर तीन वेळेपेक्षा जास्त वेळ जर आपणास केसतोड होत असेल तर मात्र जवळच्या त्वचारोग दाखवून पुढील उपचार कारणे हेच उत्तम.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *