tongue

काय सांगता , जिभेच्या आकारावरून ठरते तुमचे व्यक्तिमत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  एखाद्या पदार्थांची चव कळण्यासाठी जिभेचा वापर हा होतो. जिभेच्या आकारावरून तुमचे व्यक्तिमत्व हे कसे आहे ते कळते. हे संशोधनातून समोर आले आहे . जर तुमची जीभ आखूड , बारीक , निमुळती आणि जाड असेल तर त्यावेळी तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ते लक्षात येते .जिभेचे आकार हे प्रत्येक मनुष्याचे वेगवेगळे असते . जीभ हि वेगवेगळ्या आकारांमध्ये असते .

— आखूड जीभ

ज्यांची आखूड जीभ असते ते खूप स्वच्छ हृदयाचे असतात पण ते खूप बोलणारे असतात, तासन तास ही त्यांना बोलायला लावले तरी ते थकत नाहीत. असे म्हंटले जाते . अशी लोक हे फार रोमांचक असतात. अशी लोक हे आपली चूक लगेच मान्य करतात .आपल्याकडून कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी हि लोक घेत असतात .

— लहान व निमुळती जीभ

ज्यांची लहान व निमुळती जीभ असते ते खूप कमी बोलतात. आणि त्यांना शांत राहायला आवडते. ते कोणत्याही कामात त्यांना जास्त बोलायला आवडत नाही . त्यांचा स्वभाव हा आत्मकेंद्री असतो. पण अशी लोक हे आपली कामे हि योग्य वेळेत करून घेण्यात फार हुशार असतात . अशी लोक हे कोणाच्यात लगेच मिक्स होत नाहीत .

— लांब जीभ

ज्या लोकांची जीभ हि लांब आहे. अशी लोक हे कोणच्यावर लगेच विश्वास ठेवतात. अशी लोक हे लगेच कोणत्याही कामांमध्ये लगेच गोंधळून जातात . अशी लोक हे फार मनमिळाऊ असतात . नोकरीच्या ठिकाणी त्यांचे सगळ्या लोकांशी खूप जमते त्यामुळे त्यांना लवकर स्थिरता मिळते .

— वळणदार जीभ

ज्यांची वळणदार जीभ असते, ती कोमल हृदयाचे असतात. ती कुणी ओरडले तरी रडायला लागतात. खूप हळवा स्वभाव असल्याने अनेकांचा जीव हा त्या व्यक्तीवर असतो. अशी व्यक्ती सुद्धा सगळ्यांची खूप काळजी घेते. ह्या प्रकारच्या व्यक्ती कला, साहित्य, पाककला, मीडिया ह्या क्षेत्रात जास्त दिसून येतात.

— जाड जीभ

जाड जीभ असलेली व्यक्ती हि खूप शिस्तशीर असते . त्या लोकांचा स्वभाव हा कडक असतो. काही खोट्या गोष्टी त्यांना सहन होत नाहीत . अशा वेळी ते मात्र भांडायला तयार असतात. या व्यक्तीला राग हा लवकर येत असतो. सगळ्या लोकांना धाकात ठेवण्याचे काम अशी व्यक्ती करत असते .