sugarcane juice

उन्हाळ्याच्या दिवसांत प्या गुराळ्यातला रस

हॅलो आरोग्य ऑनलाईन । उन्हाळा सुरु झाला कि , वातावरणातील तापमान हे वाढायला सुरवात होते . वातावरणात गरमीचे प्रमाण हे वाढते . त्यावेळी नेहमी या काहीतरी थंड खाल्ले पाहिजे , किंवा कोणत्याही थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा असे वाटत असते . उन्हाळयात सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आपल्या त्वचेची काळजी हि जास्त प्रमाणात घेतली पाहिजे . उन्हाळयाच्या दिवसांत काहीतरी थंड पिण्यास वाटू शकते . अश्या वेळी कोणत्याही रासायनिक युक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्यापेक्षा सेंद्रिय पदार्थांचं वापर हा केला जावा .

आपल्या आहारात उसाचे खूप महत्व आहे . उसाच्या रसामध्ये कोणतेही केमिकल नसते जे किआपण बाहेरून घेत असलेल्या वेगवेगळ्या पेयांमध्ये असते. उसाच्या रस हा गोड असतो. त्याचा वापर जर दुपारच्या वेळेत केला तर मात्र आपल्याला काही तरी थंड खाल्ले गेल्याचे समाधान होईल . तसेच आपली तहान सुद्धा भागली जाईल आणि मन तृप्त झाल्याचा भास होईल. उसाच्या रसाचे अनेक औषधीय गुणधर्म आहेत , कि ज्याने आपल्या शरीराला फक्त फायदाच होऊ शकतो.

उसाच्या रसाचे असलेले महत्व हे अनन्यसाधारण असेच आहे. उसाच्या रसात जास्त प्रमाणात आम्लीय गुणधर्म नसल्याने आपल्या आतड्यानावर कोणताही चुकीचा प्रभाव हा पडत नाही . आणि तसेच आपल्याला किडनीचे  विकार हे दूर होण्यास मदत होऊ शकते . उसाच्या रसात ग्लुकोज चे प्रमाण हे जास्त असते . त्यामुळे ज्यावेळी चक्कर येत असेल त्या वेळी त्याचा वापर हा केला जावा