Carror Ginger Soup
| | |

गोठवणाऱ्या थंडीत प्या गाजर आल्याचे आरोग्यदायी सूप; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एकीकडे थंडी अगदी कडाडून पडली आहे. तर दुसरीकडे संसर्गजन्य विषाणूची भीती पसरली आहे. जगावे का मरावे अश्या परिस्थिती लोक अडकली असताना आरोग्याची काळजी घेणे हि प्रत्येकासाठी प्राधान्याची बाब ठरत आहे. मग अश्यावेळी आपण आरोग्याची काळजी घ्यायची कशी? हा प्रश्न पडणे फारच साहजिक आहे. यासाठी तुम्ही फार विचार करत असाल तर याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला आज एक असा सोप्पा सूपचा प्रकार सांगणार आहोत. जो जाणून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल अरेच्छा एव्हढं सोप्प होतं हे..? कारण हे सूप काही कठीण नाही. हे अगदी रुचकर, पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गाजर- आल्याचे सूप आहे.

  • गाजरात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतात. जे आपल्या शरीराला विविध आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करतात.
  • आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
  • याशिवाय या सूपमध्ये लवंग, काळी मिरी, लसूण यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे केला जातो. ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक गुणधर्म असतात. एकंदरीत सर्दी- खोकला यांसारखे संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी हे सूप आपल्याला मदत करते.

० गाजर आल्याचे सूप बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

  • गाजर १ लहान तुकडे केलेले
  • आलं १ इंच
  • कांदा १ छोटा चिरलेला
  • मीठ चवीनुसार
  • मिरपूड चवीनुसार
  • लवंग ४ ते ५
  • लसूण ५ ते ७ पाकळ्या बारीक चिरलेल्या
  • लिंबाचा रस/ व्हिनेगर १ चमचा
  • कोथिंबीर आवडीप्रमाणे
  • ऑलिव्ह ऑइल २ चमचे
  • पाणी १ वाटी
Ingredients

० गाजर आल्याचे सूप बनविण्याची कृती –

हे सूप बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा. यात कांदा, मीठ, मिरपूड घालून किमान ५ मिनिटे शिजवा. यानंतर आता त्यात लवंग, लसूण आणि चिरलेले गाजर घाला. व्यवस्थित ढवळून आता झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा. यानंतर त्यात २ इंच आले किसून घाला आणि १ वाटी पाणी घाला. आता गाजर मऊ झाल्यावर त्यात १ चमचा लिंबाचा रस वा व्हिनेगर घाला. यानंतर सुमारे २० मिनिट ते शिजवा. आता तयार सूप गॅसवरून उतरवून हँड ब्लेंडरने मिक्स करून प्युरीसारखे बनवा. पुढे चाळणीतून गाळून एका भांड्यात काढा. आता कोथिंबीरीने सजवून गरमागरम सर्व्ह करा.

Making Soup

० हिवाळ्यात गाजर-आले सूप पिण्याचे फायदे –

  • रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  • डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
  • घशातील सूज किंवा दुखण्याची समस्या दूर करते.
  • सूप प्यायल्याने बंद झालेले नाक उघडते आणि शरीर गरम राहण्यास मदत होते.
  • अद्रकामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक गुणधर्म आढळतात, त्यामुळे हंगामी आजार होत नाहीत.
  • गाजर-आले सूप पिण्याची वेळ जास्त कॅलरी असल्यामुळे दुपारच्या जेवणात किंवा नाश्त्यात त्याचा समावेश करा, मग तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल.
  • हे सूप रिकाम्या पोटी खाण्याऐवजी लापशी, उपमा, चिऊला आदींसोबत खाल्ल्यास अधिक फायदा होईल.
  • रात्री हलके काही खायचे असेल तरच हे सूप खा. यामुळे पोट रात्रभर भरलेले राहते आणि ऊर्जाही मिळते.