| | | |

हिवाळ्यात फक्त मुळा नव्हे तर त्याची पानेसुद्धा खाणे फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या दिवसात वातावरणात होणारा बदल हा आपल्या शरीरावर बाहेरून आणि आतूनही तितकाच प्रभाव करत असतो. यामुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपला आहार बदलणे खूप गरजेचे आहे. तसेच आहारात अशा भाज्यांचा समावेश गरजेचा आहे ज्या भाज्या खाल्ल्याने हिवाळा बांधणार नाही. जसे कि- मुळा. होय. मुळा खाल्ल्याने सर्दी होत नाही. शिवाय अनेक आजारांपासून बचाव होतो. पण फक्त मुळा खाऊन काय फायदा नाही. यासाठी मुळ्याची पानेदेखील खाणे तितकेच गरजेचे आहे.

कारण मुळ्यामध्ये जीवनसत्त्वे अ, बी आणि सी असते. तर मुळ्याच्या पानांमध्ये फॉस्फरस, लोह, क्लोरीन, सोडियम आणि मॅग्नेशियम याशिवाय इतरही अनेक पोषक द्रव्ये असतात. हे सर्व घटक पोटासाठी फायदेशीर असतात. शिवाय मुळ्याची पाने मूत्रमार्गाच्या विकारांमध्ये देखील खूप फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

१) मुळ्याच्या पानांपासून बनवलेली भाजी खाल्लयाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

२) मूल्याची पाने खाल्ल्यास शारीरिक थकवा जाणवत नाही.

३) मुळ्यासोबत त्याची पाने खाल्ली तर रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४) मुळाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आणि लोह आढळते, त्यामुळे प्रतिकारशक्तीसह शरीरातील रक्तपेशी सक्रिय राहतात.

५) मुळ्याच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. याचा फायदा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास होतो.

६) मुळ्याची पाने कमी रक्तदाबाच्या रुग्णांना फायदेशीर आहेत. कारण मुळ्याच्या पानांमध्ये असणारे सोडियम शरीरातील मिठाची कमतरता दूर करते.

७) मूल्याची पाने ठेचून त्याचा रस प्यायल्यास कावीळच्या समस्येमध्ये आराम मिळतो. यासाठी मुळा आणि त्याची पाने ठेचून नंतर पातळ कापडाच्या सहाय्याने रस काढा. सलग १० दिवस दररोज १/२ लिटर रस प्या. यामुळे कावीळ बरी होते.

८) मुळ्याची पाने अशीच चावून खाणे वा त्यांचा लेप केसांना लावणे केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे केसगळती दूर होते आणि केस दाट होतात.