| | | |

आहारात मूग डाळीचा समावेश करा आणि मिळवा हे फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय खानपान पद्धतीत डाळींचा विशेष समावेश आहे. अनेक ठिकाणी तर डाळींशिवाय जेवणाचे ताट पूर्णच होत नाही. अनेक राज्यांमध्ये तूर डाळ प्रामुख्याने खाल्ली जाते तर अनेक राज्यांमध्ये मूग आणि मसूर डाळ खाल्ली जाणे. पण या डाळींमध्ये मूग डाळ खाणे अतिशय लाभदायक मानले जाते. आजारपणात देखील डॉक्टर मूग डाळीचे वारं खाण्याचा सल्ला देतात कारण मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असते. त्यामुळे प्रामुख्याने आजारपणात आणि अशक्तपणा आल्यास मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि मूग डाळीची खिचडी खाणे फायदेशीर ठरते. याशिवाय मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. अगदी त्वचेवरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.

मूगाच्या डाळीत व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सह पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट आणि फायबर भरपूर असते. यामुळे मुगाच्या डाळीचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते. आहारात नियमितपणे मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुले अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊयात मूग डाळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) मेंदुसाठी फायदेशीर – मूगाच्या डाळीत आयर्नचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे मुगाची डाळ दररोज खाल्ल्याने शरीर आणि मेंदु यांच्या कार्यप्रणालीत सुधार घडविण्यास फायदेशीर ठरते.

२) पचनक्रियेत सुधार – मूग डाळ पचायला हलकी असल्याने अनेक पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. शिवाय मूग डाळीमध्ये फायबर असते हे पचन क्रिया सुरळीत होण्यासाठी मदतयुक्त भूमिका निभावतात.

३) गॅसची समस्या होत नाही – मुगाच्या डाळीत आढळणारे फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं. परिणामी पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण कमी होत आणि कालांतराने शरीरात गॅस निर्मिती होत नाही.

४) पोटदुखीवर आराम – पोटातील बिघाडामुळे जुलाब वा लूजमोशन सारख्या समस्या संभवतात. यांवर उत्तम उपाय म्हणजे एक वाटी मूगाच्या डाळीचे पाणी प्या. यामुळे शरीराला पाणी मिळते आणि मुगाची डाळ पोटाची समस्या दूर करून पोटदुखीपासून आराम देते.

५) वाढते वजन नियंत्रणात – भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुगाची डाळ मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग डाळ खावी. यामुळे सतत भूक लागत नाही आणि अनावश्यक पदार्थ खाल्ले जात नाहीत. परिणामी वजन नियंत्रणात राहते.

६) रक्तदाब आटोक्यात – मूग डाळ खाल्ल्यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहतो.

७) लहान मुलांसाठी पौष्टिक – लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मूग डाळ मदत करते. याशिवाय मूग डाळ पचायला हलकी असल्यामुळे मुलांना अपचनाचा वा पोटाचा त्रास होत नाही आणि मुलांची शारीरिक ऊर्जा संतुलित राहते.

८) अकाली सुरकुत्या – मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात आणि अगदी नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी होतात.

९) केसांच्या आरोग्यासाठी – मूगडाळीमध्ये कॉपर असते. जे केस मजबूत करण्यासाठी मदत करतात. मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते आणि यामुळे केसांना समूळ मजबुतपणा येतो.