| |

पोटाची वाढलेली ढेरी हिवाळ्यात कमी करता येते; कसे? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या हंगामात शरीर अगदीच सुस्त होते. यामुळे आपले वजन अचानक वाढताना दिसते. खरतर थंडीच्या दिवसात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. परिणामी घरात सतत गाजरचा हलवा बनवला जातो आणि तो खाल्ल्यामुळे वजन वाढते. याशिवाय इतर गोड पदार्थ, हॉट चॉकलेट यासारखे पदार्थ खाणे लठ्ठपणा वाढवण्यास जबाबदार असतात. यामुळे पोटावरील चरबी वाढतच जाते. मात्र, थंडीत खाण्यापिण्याच्या काही गोष्टी वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी मानल्या जातात. हे पदार्थ वजन कमी करतात आणि पोटावरील अतिरिक्त चरबीसुद्धा वेगाने कमी करतात. पण हे पदार्थ कोणते हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) गाजर – थंडीमध्ये गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. म्हणून सतत गाजराचा हलवा करून खाणे योग्य नाही. या ऐवजी गाजर कच्चे वा उकडून खाणे फायदेशीर आहे. कारण गाजरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात गाजर पचवणे शरीरासाठी सोपे नसते. या कारणामुळे ते खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. स्वभाविकपणे जर मनुष्याला भूक लागली नाही तर वजन कमी होणे अतिशय स्वाभाविक आहे.

२) बीट – बीटामध्ये खाल्लेले अन्न पचण्यास सहाय्यक असणारे आणि वजन कमी करणारे फायबर आढळते. यातील पोषकतत्व मनुष्याचे वजन वेगाने कमी करते. परिणामी शरीरातील अतिरिक्त चरबी जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

३) दालचिनी – स्वयंपाक घरातील रोजच्या वापरात येणारी दालचिनीदेखील हिवाळ्यात वेगाने वजन कमी करण्यासाठी मदत करते. यातील सिनमॉल्डेहाईड फॅटच्या आतड्यांच्या ऊतीचे मेटाबॉलिज्म संतुलित ठेवते.

४) मेथी दाणे – हिवाळ्यात मेथी दाणे खाल्ल्याने वजन कमी होते. इतकेच नव्हे तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील मेथी दाणे सहाय्यक आहेत. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टमसुद्धा व्यवस्थित राहते आणि बीटात आढळणारे ग्लॅक्टोमॅनन भूक नियंत्रित करते.

५) पेरू – हिवाळ्यात पेरूसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. पेरू खाल्ल्याने अनेक तास भूक लागत नाही. परिणामी अतिरिक्त खाल्ले जात नाही आणि वजन कमी होते. शिवाय पेरूतील फायबरमुळे मेटाबॉलिज्म चांगले राहते. ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होते.

६) पाणी – तसेही कोणताही हंगाम असो आपल्या शरीराला पाण्याची जितकी गरज आहे तितके पाणी आपण पिणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात फार तहान लागत नाही. यामुळे आपण पाणी पीत नाही. शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डी-हायड्रेट होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टमवर वाईट परिणाम होतो. म्हणून थंडीच्या दिवसात गरम पाणी वा हर्बल टी पिणे फायदेशीर आहे. यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते आणि भूकसुद्धा कमी लागते. परिणामी आपलया पोटावर वाढलेली चरबीदेखील कमी होऊ लागते.