| |

बद्धकोष्ठता वाढलीय;पोट साफ होत नाही? ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम आणि व्हाल निरोगी आणि समाधानी

हॅलो आरोग्य ऑनलाईन : नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून गंभीर आजार संभवू शकतात. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्यता असते. मांसाहार, तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते. शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.

या पदार्थांमुळे उद्भवते बद्धकोष्ठतेची समस्या :
दारू : मद्यपान केल्यामुळे शरीर डीहायड्रेट होऊ शकते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने, तुमच्या आतड्यांवर खोलवर परिणाम होतो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
प्रक्रिया केलेले धान्य : प्रक्रिया केलेल्या धान्यांमध्ये पांढरे तांदूळ, पांढरा पास्ता आणि पांढरा ब्रेड या पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे हे पदार्थ देखील आपल्या बद्धकोष्ठतेचे कारण ठरते. वास्तविक, या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते, यामुळे बद्धकोष्ठता अधिक होते.
दुग्ध उत्पादने: जे लोक दुग्धजन्य पदार्थांचे नियमित सेवन करतात, त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या सर्वात जास्त असते. दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले पचन नेहमीच चांगले राहिले.
लाल मांस (रेड मीट): लाल मांसाचे अर्थात रेड मीटचे सेवन केल्यानेही बद्धकोष्ठतेची निर्माण होते. या मांसामध्ये सामान्यत: चरबीचे प्रमाण जास्त असते आणि फायबर कमी असते, यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते.
तळलेले अन्न किंवा फास्ट फूड : तळलेले किंवा जास्त चरबीयुक्त आणि फायबर कमी असलेले अन्न आपले पचन क्रिया मंद करते. या पदार्थांमध्ये चिप्स, कुकीज, चॉकलेट आणि आईस्क्रीमचा समावेश आहे. याऐवजी आपण फळे आणि हिरव्या भाज्या खाव्यात.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

  • बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यातून लिंबू आणि एरंडेल तेल हे एकत्र करुन प्यावे. त्यामुळे ही समस्या हळूहळू कमी होत जाते.
  • रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा मध टाकून प्यावे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते आणि आपले पोटही निरोगी राहते.
  • गरम पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून ते प्यावे.
  • त्रिफळा पाण्यात टाकून ते पाणी उकळावे. त्यानंतर थंड पाणी करुन त्याचे सेवन करावे.
  • पपई खाणे आरोग्यासाठी आणि पोटासाठी चांगले आहे. पपईने पोट साफ राहते. यात भरपूर व्हिटामिन डी आहे.
  • अनेकजणांना शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा व्यक्तीने दिवसभरात किमान ४ ते ६ लिटर पाणी प्यायला हवं. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी तत्त्व बाहेर निघून जातात आणि आरोग्या उत्तम राहतं.
  • एका ठिकाणी बसून काम करणाऱ्यांना हा त्रास जास्त होतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर दररोज सकाळी किमान अर्धा तास तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला हवं. असं केल्याने तुम्हाला लगेच फरक माहित पडेल.
  • जेवताना एक चमचा ऑलिव्ह ऑइल सेवन करावं. असं केल्याने दीर्घकाळापासून होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास लगेच कमी होतो.
  • वेलदोडेसुद्धा यासाठी गुणकारी आहेत. ऍसिडिटी समस्येवर ते अत्यंत गुणकारी आहेत. बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा वेलदोड्यामुळे कमी होतो. त्यासाठी तीन वेलदोडे बारीक करून उकळत्या पाण्यात टाका. थंड झाल्यानंतर ते पिल्यास लगेच आराम पडतो.
  • बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडासुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी उत्तम आहे. एक कप गरम पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकून ते पाणी पिल्यानेसुद्धा लगेच फरक पडतो.
    कपभर दुधात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तूप टाकलेलं मिश्रण घेतल्यानेसुद्धा मलावरोधाचा त्रास कमी होतो.
  • कपभर उकळलेल्या दुधात दोन अंजीर घालून ते आणखी उकळावं. हे प्यायल्याने बद्धकोष्ठता कमी होते.
  • सकाळी उठल्यानंतर पेलाभर पाण्यात दोन चमचे मध टाकून ते प्यावं. हा उपाय बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे.
  • अंजीर: अंजीर तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा गरम पाण्यासोबत घेऊ शकता.
  • लिंबू : आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे. सकाळी रिकाम्या पोटी घेतलेले लिंबुपाणी पोट साफ करण्यास मदत करते. तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते.
  • संत्री : हे व्हिटामिन ‘ सी’ व फायबरने समृद्ध आहे. फळांतील फायबरमुळे पोट साफ होते . सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.. संत्री रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, अत्यंत गुणकारी आहेत.
  • मनुका: मनुकादेखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत. त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते . रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो. गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
  • पालक: पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुजीवीत करण्यास मदत करतो. 100 मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो . तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावरदेखील पालक हितावह आहे.
  • त्रिफळा :चूर्ण त्रिफळा चूर्ण हे आवळा , हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते . हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौचास सुलभ होण्यास मदत होते. चमचाभर त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत अथवा मधासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो.
  • पेरू:  पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो .पेरूमध्ये व्हिटामीन बी व सी अधिक आहेत. पेरूतील गरामध्ये विद्राव्य (soluble ) फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य (insoluble ) फायबर असतात. त्यामुळे पोट साफ होऊन भूकवाढीसाठी पेरूचे सेवन हितावह आहे.
  • बियांचे मिश्रण २-३ सूर्यफूलांच्या बिया, थोडे आळशीचे दाणे, तिळाच्या बिया व बदाम यांची पूड करून नियमित घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो. यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जीवित होतो.

वरील घरगुती उपायांनीही जर आली पचनाशी संबंधित समस्या जर कमी होत नसेल तर मात्र तज्ञ् डॉक्टरांच्या कडून पुढील उपचार केलेले उत्तमच.