Sunburn
| | |

रखरखत्या उन्हात वाढला सनबर्नचा धोका.? तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे अशा दिवसात आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त त्वचेचीच नाही तर संपूर्ण शरीराची काळजी घ्यायला हवी. पण अशा दिवसात सूर्याच्या तप्त किरणांचा सगळ्यात आधी मारा होतो तो आपल्या त्वचेवर. ज्यामुळे एकतर त्वचेची आग आग होते. त्वचेवर लाल चट्टे येतात. त्वचा लाल होते. त्वचेवर लाल पांढऱ्या पुळ्या येतात आणि खाज येते. यामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय उन्हासोबत उष्ण हवा, घामाच्या धारा आणि प्रदूषण आहेच. त्यामुळे नुसतं घराबाहेर पडायची खोटी कि आरोग्याची वाट लागलीच म्हणून समजा.

उन्हाळ्यात तीव्र उन्हामूळे त्वचेची काळजी न घेता घराबाहेर पडणं म्हणजे सौंदर्याची पुरेपूर वाट लावण्यासारखं आहे. कारण या दिवसातील ऊन हे त्वचेस हानिकारक ठरतं. त्यामुळे साहजिकच सनबर्नचा धोका वाढतो. यात चेहरा टॅन होतो. काळपट पडतो. तर त्वचा सूजते. सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्याने त्वचा पोळली जाते. साधारणपाने कडक उन्हात १० मिनिटांपेक्षा अधिक काळ राहिल्यास सनबर्न होण्याची प्रक्रिया सुरु होते. यामुळे त्वचेतला ओलावा निघून जातो आणि त्वचा रुष्क होते. यामुळे त्वचेचा पोत खराब होतो. अकाली वृद्धत्व येते. पण या उन्हाळ्यात असे होणार नाही. कारण आज आम्ही तुम्हाला सनबर्नसाठी घरच्याघरी प्रतिबंधात्मक कोणते उपाय करावे हे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१. संरक्षक कपडे –

सनबर्नचा धोका टाळण्यासाठी घराबाहेर जाताना सनकोट घाला. तसेच चेहऱ्याभोवती कॉटनचा स्कार्फ जरूर बांधा. यामुळे उन्हाच्या झळा आणि गरम वाफांपासून त्वचेचं संरक्षण होतं. परिणामी त्वचेवर थेट किरणांचा मारा होण्यापासून बचाव होतो.

२. बर्फाचा मसाज –

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना त्वचेची काळजी घ्याच. पण घरी आल्यावरही घ्या. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यास सर्वात आधी सुती रुमालात थंड बर्फाचा तुकडा घेऊन तो चेहेऱ्यावर हळूवार फिरवा. अशाप्रकारे चेहऱ्याला बर्फाचा मसाज करा. ज्यामुळे उन्हाने त्वचेची होणारी आग थांबते.

३. टोनरचा वापर –

उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर साधारण ५ मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यानंतर चेहऱ्याला टोनर लावा. तसेच चेहरा धुवून नंतर बर्फाने थोडा वेळ मसाज करा आणि मग टोनर लावा. यामुळेही फायदा होतो.

४. D क्रीम –

कडक उन्हामुळे होणाऱ्या सनबर्नपासून त्वचेचे रक्षण करायचे असेल तर D जीवनसत्वयुक्त क्रीम वापरावी. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. शिवाय त्वचेवर चमकही येते.

५. माॅश्चरायझर –

उन्हाळ्यात त्वचेत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आंघोळीनंतर त्वचेवर माॅश्चरायझर जरूर लावा. यामुळे त्वचा शुष्क होत नाही आणि आकसतदेखील नाही. त्यामुळे सनबर्नमुळे एजिंगचा धोका टळतो.

६. सनस्क्रीन –

उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर अतिशय गरजेचा आहे. कारण सनस्क्रीनमुळे सनबर्नचा धोका टाळता येतो. फक्त आपल्या सनस्क्रीनमध्ये अँटीऑक्सिडंट, अ आणि क जीवनसत्व असणे आवश्यक आहे.