| | | |

कोव्हीड १९ विषाणूंवर गुळवेल ठरतेय गुणकारी; कोरोनाला हरवण्यासाठी ‘या’ गुणधर्मामुळे वाढली मागणी

हॅलो आरोग्य ऑनलाईन : गुळवेल म्हणजेच गुडुची किंवा शास्त्रीय नावानुसार टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) ही वनस्पती भारत, श्रीलंका  आणि म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.या गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. मराठी नाव- गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारूडवेल. महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते.

गुळवेलाची वेल आकाराने मोठी आणि मांसल असते मोठ्या झाडांवर किंवा कुंपणांवर पसरलेली दिसून येते. ह्या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. ह्या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः ह्या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात.

गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृता असं नाव देण्यात आलं आहे.अगदी  नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे, जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलाची लागवड तुम्ही अगदी घराबाहेर किंवा बागेतही करू शकता. ह्याची वेल सदैव हिरवीगार राहत असल्याने बऱ्याचदा सजावटीसाठीही ह्याचा वापर केला जातो. गुळवेलाची पान ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात. गुळवेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आढळतात आणि ह्याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ आढळते. आपली रोगकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी समजल्या जाणाऱ्या गुळवेल आणखीन हि अनेक गुणधर्म आहेत.

तापावर रामबाण उपाय (Fever)

कोणत्याही प्रकारच्या तापावर गुळवेल हा रामबाण उपाय आहे. म्हणूनच सर्व तापावरील औषधांमध्ये ह्याचा वापर केला जातो.

रोग प्रतिकारशक्तीत वाढ करणारी गुळवेल (Boosts Immunity)

कोरोना हा श्वसनसंस्थेशी संबंधित विकार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे ते लोक पहिल्यांदा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. गुळवेल (Gulvel) तुमच्या शरीरातील प्रतिकार क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते.

पचनास मदत करते (Helps In Digestion)

मानसिक तणाव, चिंता, भीती आणि असंतुलित आहार इत्यादी गोष्टी तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम करत असतात. गुळवेलांमध्ये पचन आणि ताण दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. ह्याच्या सेवनाने भूक ही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.

मधुमेहासाठी वरदान गुळवेल (Helps To Control Diabetes)

जर तुम्हाला मधुमेह आहे, तर गुळवेल हे तुमच्यासाठी वरदान आहे. कारण गुळवेलमध्ये हाइपोग्लिसीमिक अर्थात साखर कमी करणारे घटक आढळतात. ज्यामुळे रक्तदाब आणि लिपीडचा स्तर कमी होतो. गुळवेलच्या नियमित सेवनाने टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांना विशेष फायदा होतो. रोज गुळवेल रस प्यायलाने साखर कमी होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Beneficial For Eyes)

गुळवेल ही वनस्पती डोळ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. डोळ्यांच्या कोणत्याही समस्येला ही वनस्पती दूर करते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात मदत करते. गुळवेल वनस्पती पाण्यात उकळून ते पाणी डोळ्याला लावल्यास डोळ्याचे सगळे आजार दूर होतात. गुळवेलाच्या वापराने चष्म्याचा नंबरसुध्दा कमी होतो. गुळवेलाच्या पानांचा रस मधात घालून डोळ्यांना लावल्यास डोळ्याचे सगळे छोटे मोठे आजार बरे होतात. आवळा आणि गुळवेलाचा रस एकत्र करून प्यायलास नजर तीक्ष्ण होते.

खोकला (Cough)

खूप दिवस खोकला जात नसल्यास गुळवेलाच्या रसाचे सेवन करावे. हा रस रोज सकाळी घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. सर्दी-पडसं, ताप इत्यादी आजारांमध्ये गुळवेलीच्या खोडाचा तुकडा पाण्यात उकळावा आणि ते पाणी प्यावं. ह्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे अशक्त रूग्णांना वारंवार होणारी सर्दी-पडसं, ताप इ. आजार बरे होतात.आजकाल चिकन गुनियासारख्या व्हायरल तापातून बरे झाल्यावर बऱ्याच रूग्णांना महिनोमहिने गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. अशा वेळी गुळवेलाच्या पानांचा काढा लाभदायी ठरतो.लहान मुलांमधील सर्दी, खोकला आणि तापात गुळवेलाच्या पानांचा रस काढून तो दोन तीन वेळा मधाबरोबर चाटण करून द्यावा. लगेच फरक पडतो.तापामुळे अशक्तपणा आल्यास तो दूर करण्यात ही गुळवेल हे गुणकारी औषध आहे.

गुळवेल चे फायदे (Giloy Benefits In Marathi)

  • गुळवेलाचा रस घेतल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. अॅनीमिया असलेल्या रूग्णांनी गुळवेलाच्या रसाचे सेवन केल्यास फरक पडतो.
  • मधुमेह रोगात (डायबिटीज) ही गुळवेलाचा रस गुणकारी आहे.कावीळ झाल्यास गुळवेलाच्या पानांची पावडर मधाबरोबर घेतल्यास फायदा होतो.
  • कावीळीमुळे रूग्णाला येणारा अशक्तपणा गुळवेल घेतल्यास दूर होतो. तसंच गुळवेलाचा काढा मधातून दोन-तीन वेळा घेतल्यास आराम पडतो.
  • हातापायांची जळजळ होत असल्यास गुळवेलाची पान वाटून सकाळ संध्याकाळ पायाला आणि हाताला लावा. जळजळ कमी होईल.
  • स्त्रियांच्या पाळीदरम्यान गुळवेलाचा रस सेवन केल्यास खूपच लाभदायी ठरतो.
  • गुळवेलाच्या रसाच्या सेवनाने अॅसिडीटीचा त्रास दूर होतो.
  • गुळवेलाच्या फळांचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यास तारूण्यपिटीका, फोड आणि पुळ्या बऱ्या होतात.
  • कान दुखत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस काढावा आणि एक दोन थेंब कानात घालावे. लगेच आराम मिळतो.
  • अंगाला खाज येत असल्यास गुळवेलाच्या पानांचा रस आणि हळदीचा लेप करून शरीरावर लावावा खाज थांबेल आणि त्वचासुध्दा चमकदार होते.

गुळवेल ही वनस्पती किती फायदेशीर आहे. ते आपण बघितलं पण काही परिस्थितींमध्ये ह्याचे सेवन करणे नुकसानदायक किंवा त्याचे दुष्परिणाम ही दिसून येतात.  जर तुम्ही मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये. शस्त्रक्रिया झाल्यावरही ह्याचा वापर टाळावा

सार : अमृततुल्य गुळवेलाचे अनंत लाभ असल्याकारणाने त्याला अमृता असे संबोधले आहे. गुळवेलाच्या नित्य उपयोगाने आपण निरोगी राहून अनेक रोगांपासून सुरक्षित राहू शकतो.