|

शारीरिक हावभाव जीवनशैलीवर अधिक प्रभावी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शारीरिक हाव भाव म्हणजे काय? तर शारीरिक हाव भाव म्हणजे आपल्या शारीरिक हालचाली. ज्यांच्या सहाय्याने आपण आपली सहमती वा असहमती आणि इतर भावनांचे प्रभावी प्रदर्शन करीत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीवर आपल्या शारीरिक हावभावांचे विशेष प्रभुत्व असते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अनुवंशिकता आणि वातावरणाचा प्रभाव असतो. या दरम्यान काही पूर्व व्यक्तींचे स्वभाव विशेष गन पुढील पिढीत आल्याचे निदर्शनास येते. परंतु त्या व्यक्तीला स्वतः वाटलं तर तो इतर लोकांमधील सकारात्मक गुण अंगीभूत करून विशेष यशोशिखर गाठू शकतो.

शारीरिक हावभाव हे एका प्रकारे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे संकेत असतात. शारीरिक हावभाव खरतर शारीरिक संकेतांची आणि विविध भावतरंगाची भाषा आहे आणि हि भाषा आपल्या जीवनशैलीसाठी अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही कधी अनुभवले असेल कि, काही लोकांशी संवाद साधण्यात आपल्याला आनंद वाटतो. बहुतेकदा हसरा चेहरा असणाऱ्या व्यक्ती सर्वांना प्रिय असतात. कारण चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यामधील चमक हे शारीरिक हावभाव एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व दर्शविते. चला जाणून घेऊयात काही विशेष हाव भाव :-

१) खेळाडू, विद्यार्थी, राजनेता किंवा तरुण दोन बोटे उभी करून काही न बोलता बरच काही बोलून जातात. या दोन बोटांचा अर्थ असतो कि, “आम्ही जिंकतोय“ किंवा आम्ही जिंकलो.

२) एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना शारीरिक हावभावांचा योग्यरीत्या वापर करताना दिसतो. या हावभावांच्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांशी आणखी संलग्न होत असतो. ज्यामुळे विद्यार्थी शिक्षक आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजू शकतात. या दरम्यान अनेकदा विद्यार्थी खोट बोलतात कि खरं हे त्यांच्या शारीरिक हावभावावरून शिक्षकांना अगदी सहज समजते.

३) अनेकदा आपण केलेली चुक लपवताना लहान मुले बोलताना अडखळतात. हिदेखील एक हाव भाव व्यक्त करणारी परिस्थिती आहे.

५) शारीरिक हावभावात डोळ्याचे सर्वात जास्त महत्व आहे. कारण दोन व्यक्तींमधील संबंध त्यांचे डोळे अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करतात. यात विशेष करून पती पत्नी हे एक उत्तम उदाहरण मानले जाई.

६) अनेकदा तिसऱ्या व्यक्तीला समजू नये म्हणून दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांशी बोलतात असे ऐकले असेल. असे प्रसंग हावभाव व्यक्त करणाऱ्या शैलीत मोडले जातात.

७) तुम्ही पहिले असेल पिकनिक दरम्यान बरेच जण चित्रपट गाणी ओळखण्यासाठी ऍक्टिंग करून दाखवतात आणि समोरचे ओळखतात. हे देखील हावभाव व्यक्त करणारे एक उत्तम उदाहरण आहे.

० हावभावांचा जीवनशैलीवर परिणाम
– अनेकदा सांकेतिक भाषा विविध पेच आणि प्रसंगातून तारण्यासाठी कामी येते. कारण शारीरिक हावभावाच्या प्रभावाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. अनेकदा असेही होते कि एखाद्या व्यक्तीच्या हालचालींचा संदर्भ वेगवेगळ्या गोष्टींसोबत जोडला जातो. मात्र हा प्रत्येकवेळी बरोबरच निष्कर्ष असेल याची शाशवती नाही. साधारणतः हावभावांना समजण्याची क्षमता हि प्रत्येक व्यक्तीमध्ये असते पण याचा स्तर हा प्रत्येकात वेगवेगळा असतो. जो व्यक्ती एखाद्याचे न बोलता फक्त हावभावाने त्या व्यक्तीचे म्हणणे समजतो तोच व्यक्ती आपल्या जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात यशोपथावर मार्गस्थ होऊन जिंकताना दिसतो.