| |

लोहयुक्त पालक सूप ऍनिमियावर प्रभावी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि इतर फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीच्या दिवसात बाजारात हिरवागार पालक मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे साहजिकच घरात भाजीपाला आणायचा म्हटलं कि आपसूकच पालक येतो. आपली लहान मुले अनेकदा हिरव्या पालेभाज्या खायला नाक मुरडतात मग अश्यावेळी आपल्यालाच काहीतरी युक्ती लढवून त्यांना खाऊ घालावं लागत/ पण मुलांच्या या सवयी त्यांच्या आरोग्यावर भीषण परिणाम करत असतात. जसे कि, पालक नकोच म्हणून रडारड करणाऱ्या मुलांच्या शरीरात लोहाचे परिणाम कमी होऊ लागते. परिणामी मुलांच्या वाढीनुसार त्यांच्या शरीरातील रक्ताची कमतरता वाढू लागते आणि भविष्यात त्यांना ऍनिमियासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच कितीही आणि काहीही झालं तरी मुलांच्या आहारात पालकचा समावेश कराच.

आजकाल अनेक स्त्रियांमध्येदेखील ऍनिमियासारखा आजार बळावताना दिसत आहे. चवीला हलका तुरट आणि कडू असणारा हिरवागार पालक जर सूप म्हणून प्यालं तर त्याचे अनेक फायदे होतील. ज्या लोकांना शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे जाणवते शिवाय ज्यांना ऍनिमिया आहे अश्या रुग्णांनी पालकचे सूप पिणे हमखान आरोग्यदायी आहे. याचे कारण म्हणजे पालकमध्ये भरपूर लोह असते. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यामुळे स्त्रियांच्या आरोग्यविषयक बऱ्याच समस्यांमध्ये आराम मिळतो. फक्त हे पालक सूप हेल्दी सोबत टेस्टी कसे बनवालं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात पालक सूप बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि इतर फायदेसुद्धा:-

० पालक सूप बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
१) पालक – १ जुडी
२) आले – १/२ तुकडा
३) कोथिंबीर – १ वाटी
४) हिरवी मिरची – २
५) टोमॅटो – १ वाटी
६) लिंबाचा रस – २ चमचे
७) काळी मिरी – चवीनुसार
८) मीठ – चवीनुसार
९) पाणी – आवश्यकतेनुसार
१०) मलई – आवडीनुसार.

कृती – सर्वप्रथम पालक व्यवस्थित स्वच्छ करा. आता एका भांड्यात (आवडीनुसार दाटसर होईल इतपत) पाणी गरम करून त्यात पालक, टोमॅटो आणि आले चांगले उकळून घ्या. यानंतर आता मिक्सरमध्ये हे जिन्नस आणि हिरव्या मिरचीचे, कोथिंबीर तुकडे घालून त्याची पेस्ट बनवा. यानंतर दुसऱ्या भांड्यात २ कप पाणी गरम करून त्यात तयार पेस्ट घालून व्यवस्थित शिजवा. यानंतर आता मीठ, काळीमिरीची पूड घालून व्यवस्थित ढवळा. आता साधारण २ मिनिटे शिजवून गॅस बंद करा. तयार सूप थोडेसे थंड झाल्यानंतर लिंबाचा रस मिसळा आणि सगळ्यात शेवटी यावर मलई टाकून सर्व्ह करा.

इतर फायदे

१) निरोगी राहण्यासाठी शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते. यातील बहुतेक घटक पालकमध्ये असल्यामुळे ते खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

२) पालकमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि कॅन्सरविरोधी घटक समाविष्ट असतात. यामुळे उत्तम आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणून पालकचा समावेश होतो.

३) पालक ही लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे या घटकांनी समृद्ध असलेली हिरवी पालेभाजी आहे. यामुळे शरीरातील अनेक व्याधींवर उपाय म्हणून पालक खाण्याचा सल्ला अगदी डॉक्टरसुद्धा देतात.

४) पालकमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते. यामुळे वजन कमी करायचे असेल तर आहारात पालकची भाजी किंवा सूप असणे अत्यंत फायदेशीर आहे.

५) पालकमध्ये आवश्यक पोषक आणि फायबर भरते. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या टाळण्यास पालक मदत करते.

६) तसेच पालकमध्ये ‘व्हिटॅमिन ए’ भरपूर असते. यामुळे पालक खाल्ल्याने शरीर मजबूत होते. परिणामी रोग प्रतिकार शक्तीदेखील सुधारते.