|

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन’वर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दक्षिण आफ्रिकेत SARS-CoV-2 चा नवीन व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ समोर आला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत सापडला असला तरीही भारतातसुद्धा कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संबंधित आरोग्य विभाग प्रशासनाला नव्या व्हेरियंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेकडून बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटची माहिती दिली. बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही हा व्हेरियंट आढळल्याचे म्हटले जात आहे. शिवाय WHO च्या सांगण्यानुसार, कोरोना व्हायरसचा हा व्हेरियंट आधीच्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक संक्रमक आहे. या व्हेरियंटला जागतिक आरोग्य संघटनेनेच ‘Omicron’ असे नाव दिले आहे. यानंतर जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची चर्चा असून यावर कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी आहेत का? असा एक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यानंतर काही तज्ञांनी याबाबत अभ्यास करून आपले मत मांडले आहे.

अभ्यासक तज्ञ सांगतात कि, कोरोनावर वापरल्या जाणार्‍या mRNA लस ओमिक्रॉनवर परिणामकारक ठरू शकत नाहीत. “mRNA लसी स्पाइक प्रोटीन आणि रिसेप्टर इंटरॅक्शनकडे निर्देशित केल्या जातात. त्यामुळे mRNA लसींना कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमध्ये आलेल्या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे, परंतु सर्व लसी समान नसतात. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आपल्या शरीरात एका वेगळ्या अँटीजन सादरीकरणाद्वारे प्रतिकारशक्ती निर्माण करतात. आम्ही आतापर्यंत ओमिक्रॉनमध्ये संरचनात्मक बदल पाहिले आहेत. परंतु हा विषाणू कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा अधिक प्राणघातक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आणखी अभ्यास करावा लागेल.