Sunday, June 4, 2023

निरोगी आरोग्यासाठी फक्त प्रथिनं खाणं पुरेसं आहे का?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। विविध संसर्गांना काबू करण्यासाठी प्रथिनांचा प्रतिपिंडांच्या (अँटिबॉडीज) रूपात विशेष भाग असतो. त्यामुळे प्रथिनांना आपल्या आहारात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. ज्या आहारात पुरेशी प्रथिने उपलब्ध असतात त्यालाच पूर्ण आहार असे मानले जाते.

पण यामुळे आजकाल फक्त प्रथिने खाण्यावर भर दिला जातो. निश्चितच शरीरासाठी प्रथिने महत्वाची आहेत. पण फक्त प्रथिनांची आपलं शरीर निरोगी राहू शकते का..? तर याचेच उत्तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

० निरोगी आरोग्यासाठी फक्त प्रथिने पुरेशी आहेत का..?

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ प्रथिने खाणे हे आपल्या आरोग्यासाठी पुरेसे नसते. मात्र आजकाल तरुण फिटनेस राखण्यासाठी केवळ प्रोटीनयुक्त आहार घेण्याकडे कल देताना दिसत आहेत. यामध्ये प्रोटीन सप्लिमेंट्स, प्रोटीन शेक, प्रोटीन बार, प्रोटीन फूड, प्रोटीन कॅन्डी अशा सगळ्याच प्रोटीनची मात्रा अधिक असलेल्या आहाराचा समावेश आहे.

मात्र जे लोक नियमित व्यायाम करतात, शारीरिक कसरत करतात त्यांना नियमित प्रोटीनची फारशी गरज नसते. एकंदरच काय तर आपली तब्येत चांगली राहण्यासाठी फक्त प्रथिनं महत्त्वाची नाहीत तर इतरही अनेक घटक आहेत ज्यांची पूर्तता झाल्याशिवाय शरीर निरोगी आणि सुदृढ होत नाही.

० किती प्रथिने पुरेशी..?

आहार तज्ञ सांगतात कि, प्रत्येक व्यक्तीच्या वजनावर आणि शारीरिक ठेवणीवर प्रथिनांचे प्रमाण ठरू शकते. निश्चित असे प्रमाण सांगता येणार नाही. मात्र तरुण व्यक्तीच्या संपूर्ण वजनाच्या प्रति किलो ०.७५ ग्रॅम इतकी प्रथिनं नियमित त्या व्यक्तीसाठी गरजेची असतात.

तर वयस्कर लोकांना वजनाच्या प्रति किलो १.२ ग्रॅम प्रथिनं नियमित जरुरी असतात. याशिवाय प्रथिनांसह इतर घटकांची पूर्तता देखील तितकीच महत्वाची आहे. यामध्ये आहाराशिवाय आपली झोप पूर्ण असायला हवी. शिवाय आपण तणावमुक्त असायला हवे असे तज्ञ सांगतात.


आवडल्यास नक्की शेअर करा

हे तुम्ही वाचायलाच हवे...