Meals cooked in a cooker can be dangerous to health
|

कुकर मध्ये बनवलेले जेवण आरोग्यासाठी ठरू शकते घातक

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन ।  आपल्या घरात प्रत्येक वेळेला जर काही शिजवायचे असेल तर त्यावेळी आपल्या घरातील कुकर हा वापरला जातो. कुकर च्या मदतीने खूप लवकर आपला स्वयंपाक तयार केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक घरात कुकर चा वापर हा नित्य नियमाने केला जातो. जसे कुकर मध्ये अन्न शिजवण्याचे फायदे आहेत . त्याच पद्धतीने त्याचे तोटेही तितकेच आहेत. त्यामुळे कुकर मध्ये अन्न शिजवण्याची तोटे काय आहेत ते लक्षात घेऊया ….

एका झालेल्या संशोधानुसार आपण कोणते पदार्थ हे कुकर मध्ये शिजवणे धोकायदाक ठरू शकते याची माहिती घेऊया . अनेक वेळा आपण आपल्या आहारातील हिरव्या पालेभाज्या या कुकर मध्ये शिजवायला सुरुवात करतो. कुकर मध्ये शिजवल्याने त्यातील पाचक घटक हे नष्ट होऊन त्याचा रस नाहीसा होतो. पोषक घटक निघून जाण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोणताही पदार्थ हा प्रेशर कुकर मध्ये शिजवला जाऊ नये.

जर तुम्ही खूप स्टार्च असलेले पदार्थ हे खूप वेळ कुकर मध्ये शिजवले गेले तर त्याच्यामध्ये असलेली तत्वे हि नष्ट होण्यास सुरुवात होते. तसेच स स्टार्च असलेले पदार्थ जर कुकर मध्ये शिजवले तर मात्र अक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होते. ते शरीराला खूप घातक असते. अश्या प्रकारचे केमिकल हे आरोग्याला अजिबात योग्य नाही.

अनेक वेळा खूप जड जे पदार्थ आहेत ते शिजण्यास खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे जे पदार्थ शिजण्यास वेळ लागेल तेवढेच पदार्थ हे कुकर मध्ये शिजवले जावे. ते खूप लवकर आणि भरभर शिजले जातील आणि पचण्यास पण सोपे जाऊ शकतात.